Optical Illusion: फोटोतील २ चुका शोधाल तर ठराल जीनिअस, बघा तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 01:59 PM2024-09-05T13:59:43+5:302024-09-05T14:00:27+5:30
Optical Illusion : एक चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला २ चुका शोधायच्या आहेत.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे हे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यांमधील गोष्टी शोधणं किंवा चॅलेंज देणं लोकांना आवडतं. असे फोटो सोशल मीडियावर शेअर करून लोक एकमेकांना चॅलेंज देत असतात. असच एक चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला २ चुका शोधायच्या आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जे आपला मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. म्हणजे यातील आपल्या समोरच असलेल्या गोष्टी सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधाव्या लागतात.
आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला एक बस स्टॉप दिसत आहे. तसेच एक महिला बसचा दरवाजा उघडण्याची वाट बघत आहे. तिच्या हातात निळ्या रंगाची छत्री आहे. आता या फोटोत काय चुका आहेत त्या तुम्हाला शोधायच्या आहेत. तुमच्या माहितीसाठी यात दोन चुका आहे. ज्या तुम्हाला १० सेकंदात शोधायच्या आहेत.
काय आहे उत्तर?
याचं उत्तर साईड मिरर आणि विंडशील्ड वायपर आहे. या गोष्टी गाडीतून गायब आहेत. जर तुम्हाला या गोष्टी आधीच दिसल्या असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. कारण यातील चुका कोणत्या याचा फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही त्या बघू शकता.
फोटोतील चुका मार्क केल्या आहेत.