Optical Illusion: या फोटोत दोन बिबट्या आहेत, तुम्हाला किती दिसतायत...शोधून शोधून दमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 03:25 PM2022-10-04T15:25:52+5:302022-10-04T15:27:22+5:30
तुम्हाला दिलेल्या वेळात बिबट्या सापडला नाही तर काही टेन्शन नाही. कारण ९९ टक्के लोकांना हा बिबट्याच दिसला नाहीय.
भारताच्या जंगलात आता पुन्हा एकदा चित्त्यांची एन्ट्री झालीय. पण बिबट्या आजही या जंगलांचा सर्वात खतरनाक प्राणी आहे. सर्व भारतभरात हा प्राणी आहे. तो एवढा लपून हल्ला करतो, की सावजाला वाचणेच कठीण असते. असेच काही बिबटे या फोटोत लपलेले आहे. एक तर सहज दिसतोय. दुसरा कुठे आहे, शोधूनही सापडेल की नाही... तुम्हीच पहा...
एक बिबट्या दिसतोय, तुम्हाला चॅलेंज आहे दुसरा शोधून दाखवा. तुम्ही पाच पाच मिनिटे जरी शोधलात तरी तुम्हाला सापडणार नाही. पहिला बिबट्या थेट दिसतोय तर दुसरा झाडीमागे गायब आहे.
तुम्हाला दिलेल्या वेळात बिबट्या सापडला नाही तर काही टेन्शन नाही. कारण ९९ टक्के लोकांना हा बिबट्याच दिसला नाहीय. दुसरा बिबट्यादेखील पहिल्या बिबट्यासारखाच घात लावून बसला आहे. पण त्याचा चेहरा दिसत नाहीय. त्याचा मागचा भाग आणि काही शेपूट दिसत आहे.