Optical Illusion: या फोटोत आहेत दोन वाघ, तुम्हाला दुसरा दिसला का? भलेभले शोधून थकले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 03:10 PM2022-06-08T15:10:32+5:302022-06-08T15:17:32+5:30

Optical Illusion Viral Photo :आता हा दुसरा वाघच लोकांना त्रास देत आहे. कारण तो कुणाला दिसतच नाहीये. जास्तीत जास्त लोक या फोटोतील दुसरा वाघ शोधू शकलेले नाहीत. लोक फोटोत सगळीकडे वाघाला शोधत आहेत. पण तो काही दिसेना.

Optical illusion : There are two tigers in this picture do you see the other | Optical Illusion: या फोटोत आहेत दोन वाघ, तुम्हाला दुसरा दिसला का? भलेभले शोधून थकले...

Optical Illusion: या फोटोत आहेत दोन वाघ, तुम्हाला दुसरा दिसला का? भलेभले शोधून थकले...

googlenewsNext

Optical Illusion Viral Photo : सध्या ऑप्टिकल इल्यूजन असलेले काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो बघून लोक कन्फ्यूज होतात. सध्या वाघाचा एक फोटो असलेलं ऑप्टिकल इल्यूजन चर्चेचा विषय ठरत आहे. चर्चेचा विषय काय या फोटोने लोकांना हैराण केलं आहे. झालं असं की, या फोटोत दिसतो एकच वाघ, पण आहेत दोन. आता हा दुसरा वाघच लोकांना त्रास देत आहे. कारण तो कुणाला दिसतच नाहीये. जास्तीत जास्त लोक या फोटोतील दुसरा वाघ शोधू शकलेले नाहीत. लोक फोटोत सगळीकडे वाघाला शोधत आहेत. पण तो काही दिसेना.

ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो जर तुम्ही बारकाईने लक्ष देऊन बघितला तर यातील रहस्य तुम्हाला लगेच उलगडेल. पण त्यासाठी तुम्ही नजर तीक्ष्ण आणि बुद्धी तल्लख असली पाहिजे. या दुसऱ्या वाघाचं रहस्य वाघाच्या पट्ट्यांमध्ये आहे. वाघाच्या पट्ट्या लक्ष देऊन बघा ज्यात तुम्हाला इंग्रजीत The Hidden Tiger लिहिलेलं दिसेल. लोकांनी वाघच्या आजूबाजूला खूप शोधलं पण त्यांना काही दुसरा वाघ दिसला नाही. दुसरा वाघ हा त्या वाघाच्या पट्ट्यांमध्येच आहे. पण त्याकडे फारसं कुणी लक्षण दिलं नाही.

हा फोटो पाहून लोकांनी दुसरा वाघ शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते यात अपयशी ठरले. कारण ते आजूबाजूला सहजपणे नजर फिरवत होते. ज्यांनी त्यांच्या तीक्ष्ण नजरेने आणि तल्लख बुद्धीने फोटो पाहिला त्यांना दुसरा वाघही दिसला.

'बेस्ट इल्यूजन ऑफ द ईयर कॉन्टेस्ट' वेबसाइटनुसार, ऑप्टिकल इल्यूजनच्या स्पर्धेचं आयोजन कोणत्या ना कोणत्या कॉन्सेप्टवर आधारित असतं. या वेबसाइटनुसार, इल्यूजन असलेल्या या फोटोंची निर्मिती व्हिज्युअल सायंटिस्ट, नेत्र रोग तज्ज्ञ, न्यूरोलॉजिस्ट आणि आर्टिस्ट यांचा ग्रुप मिळून करतात.

Web Title: Optical illusion : There are two tigers in this picture do you see the other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.