डायनिंग हॉलमध्ये आहेत 2 तरूणी, पण या फोटोत आहेत एक मोठी चूक; 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 12:02 PM2023-04-26T12:02:31+5:302023-04-26T12:06:30+5:30
Optical Illusion : या फोटोत डायनिंग हॉलमध्ये दोन तरूणी आहेत. एक टेबलवर ठेवलल्या वस्तू बघत आहे तर दुसरी आरशासमोर उभी आहे. तसं बघायला गेलं तर फोटोत सगळं काही सामान्य दिसत आहे.
Optical Illusion : सोशल मीडियावर व्हायरल झालेली फोटोतील रहस्य शोधण्याची आव्हानं नेहमीच आपल्याला हैराण करतात. कारण या फोटोंमधील रहस्य शोधणं फारच अवघड काम असतं. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन किंवा ब्रेन टीजर म्हटलं जातं. या फोटोंमधील लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात किंवा त्यातील चुका सांगायच्या असतात. त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असायला हवेत. सोबतच तल्लख बुद्धीही असायला हवी.
Bright Side कडून असाच एका ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात डायनिंग हॉलमध्ये दोन तरूणी दिसत आहेत. या फोटोतील चुका शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. चुका शोधण्यासाठी तुमच्या केवळ 10 सेकंदाचा वेळ आहे.
या फोटोत डायनिंग हॉलमध्ये दोन तरूणी आहेत. एक टेबलवर ठेवलल्या वस्तू बघत आहे तर दुसरी आरशासमोर उभी आहे. तसं बघायला गेलं तर फोटोत सगळं काही सामान्य दिसत आहे. पण दावा असा आहे की, या फोटोत एक मोठी चूक आहे. ज्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर हवी आहे. ही चूक शोधणं सोपं नाही, पण मेहनत घेतली तर शक्यही आहे.
फोटोंमधील चुका शोधण्याची आव्हानं इतकी सोपी असती तर यांना आयक्यू टेस्टचा चांगला पर्याय मानलं गेलं नसतं. हेच कारण आहे की, असे चॅलेंज तल्लख बुद्धी असलेले सॉल्व्ह करणं पसंत करतात.
फोटोत असलेली चूक शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावीच लागणार आहे. जर बराच वेळ देऊनही तुम्हाला या फोटोतील चूक सापडली नसेल तर आम्ही उत्तर सांगतो. डायनिंग हॉलमध्ये जी तरूणी आरशासमोर उभी आहे तिचं आरशातील प्रतिबिंब चुकीचं आहे. ते कसं चुकीचं आहे ते तुम्हीच बघा.