Optical Illusion : अंगणात लपून बसला आहे 'चोर', जीनिअस असाल तर शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 12:20 PM2023-05-25T12:20:53+5:302023-05-25T12:22:30+5:30

Optical Illusion : या फोटोंमधील रहस्य उलगडणं सोपं नसतं. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत एक चोर लपला आहे ज्याला तुम्हाला शोधायचं आहे.

Optical Illusion : There is a thief hidden this photo can you find him | Optical Illusion : अंगणात लपून बसला आहे 'चोर', जीनिअस असाल तर शोधून दाखवा!

Optical Illusion : अंगणात लपून बसला आहे 'चोर', जीनिअस असाल तर शोधून दाखवा!

googlenewsNext

Viral Brain Teasers: सोशल मीडियावर सतत वेगवेगळे फोटो व्हायरल होत असतात. यातील काही फोटो ऑप्टिकल इल्यूजन असतात जे भ्रम निर्माण करतात. हे फोटो पाहून मेंदू कन्फ्यूज होतो. त्यामुळे या फोटोंमधील रहस्य उलगडणं सोपं नसतं. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत एक चोर लपला आहे ज्याला तुम्हाला शोधायचं आहे.

या फोटोकडे तुम्ही बारकाईने बघा आणि एका चोराचा चेहरा शोधण्याचा प्रयत्न करा. पण त्याला शोधण्यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये टायमर लावा. 10 सेकंदात तुम्हाला या चोराचा चेहरा शोधायचा आहे. बारकाईने बघाल तरच तुम्हाला यातील चोराचा चेहरा दिसू शकेल.

बऱ्याच लोकांनी या फोटोतील चोराचा चेहरा शोधण्यासाठी तासंतास वेळ दिला. पण काही मोजक्या जीनिअस लोकांनाच यातील चोराचा चेहरा दिसू शकला आहे. जर तुम्हाला यातील चोराचा चेहरा अजून दिसला नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. चोराचा चेहरा फोटोच्या उजव्या बाजूला आहे. 

या फोटोने सोशल मीडियावरील यूजरचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. लोकांना अशा ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमधील रहस्य उलगडण्यात मजा येते. इतकंच नाही तर यातील रहस्य उलगडण्यात तुमची डोळ्यांची आणि मेंदूची टेस्टही होते.

Web Title: Optical Illusion : There is a thief hidden this photo can you find him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.