Optical Illusion : या फोटोतील मुलीचे पाय पाहून कन्फ्यूज झाले लोक, तीक्ष्ण नजर असेल तर कळेल सत्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 12:51 PM2023-04-01T12:51:41+5:302023-04-01T12:52:00+5:30
Optical Illusion Photo: या फोटोत असलेल्या मुलीचे पाय पाहून जास्तीत जास्त लोकांचं डोकं चक्रावून गेलं आहे. अनेकांना हेच वाटत आहे की, मुलगी एखाद्या आजाराने पीडित आहे. पण हे सत्य नाहीये.
Optical Illusion Photo: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो बघून लोकांना आनंदही होतो आणि ते हैराणही होतात. कारण या फोटोंमुळे मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम तयार केला जातो. म्हणजे जे दिसतं नसतं, जे असतं ते दिसत नाही. सोशल मीडियावर असाच जुना ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत असलेल्या मुलीचे पाय पाहून जास्तीत जास्त लोकांचं डोकं चक्रावून गेलं आहे. अनेकांना हेच वाटत आहे की, मुलगी एखाद्या आजाराने पीडित आहे. पण हे सत्य नाहीये.
जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर तुम्ही पुन्हा एकदा या फोटोकडे बारकाईने बघा. जर तुम्हाला अजूनही सत्य दिसलं नसेल तर तुमची नजर तीक्ष्ण नाही असंच समजावं लागेल. हा फोटो ट्विटरवर @Rainmaker1973 नावाच्या यूजरने शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, हा फोटो या गोष्टीचं उदाहरण आहे की, ऑप्टिकल इल्यूजन तुमच्या मेंदुला कशाप्रकारे धक्का देतो. यात एक मुलगी आहे या मुलीचे पाय पाहून जास्तीत जास्त लोक हैराण झालेत.
फोटो पाहिल्यावर अनेकांनी याचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण जास्तीत जास्त लोकांना यात अपयश आलं. कारण या फोटोने लोकांच्या मेंदुमध्ये भ्रम तयार केला आहे. सांगायचं असं की, फोटोत जे दिसत आहे ते तसं नाहीये. पण जेव्हा लोकांना सत्य समजलं तेव्हा हसले. मुळात हा फोटो काढताना मुलीने हातात पॉपकॉर्नचं एक पॅकेट धरून ठेवलं आहे. जे पायांजवळ आहे. ते जमिनीच्या रंगासोबत मॅच झालं. ज्यामुळे तिचे पाय तसे दिसत आहेत.