Optical Illusion: हा फोटो पाहून अनेकांचं चक्रावलं डोकं, विचारातही पडले काही लोक...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 11:41 AM2022-05-06T11:41:52+5:302022-05-06T11:53:28+5:30
Optical Illusion: यूजर्सही या फोटोंकडे काही सेकंद बघतात आणि त्यातील गुपित शोधण्याचा प्रयत्न करतात. असाच एक फोटो सध्या चांगलाच गाजतो आहे. हा फोटो पाहून तुमचंही डोकं चक्रावून जाईल.
Optical Illusion: अनेकदा फोटोत जे दिसतं ते तसं नसतं. ते समजून घेण्यासाठी आपल्याला मेंदूवर जरा जोर द्यावा लागतो. अशाच फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. सध्या सोशल मीडियावर अशा फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. असे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत जे लोकांना हैराण करून सोडत आहेत. यूजर्सही या फोटोंकडे काही सेकंद बघतात आणि त्यातील गुपित शोधण्याचा प्रयत्न करतात. असाच एक फोटो सध्या चांगलाच गाजतो आहे. हा फोटो पाहून तुमचंही डोकं चक्रावून जाईल.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ऑप्टिकल इल्यूजन फोटोने लोकांची झोप उडवली आहे. फोटो तुम्ही पहिल्यांदा बघाल तर तुम्हाला दिसेल की, फोटोत एक बॉल फिरत आहे. हा काही GIF शॉर्ट व्हिडीओ नाही. हिरवा आणि आकाशी रंगाचा हा फोटो पाहून लोक अवाक् झाले आहेत. एका यूजरने लिहिलं की, हा फोटो बघून काही सेकंदातच डोकं चक्रावू लागलं.
अनेकदा लोक अशाप्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो पाहून विचारात पडतात. तसंच काहीसं या फोटोबाबत झालं आहे. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यावर लोक विचारात पडले की, अखेर हे आहे तरी काय? लोकांना या फोटोने प्रश्नात पाडलं आहे. अनेकजण हा फोटो पाहून त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या हाती काही लागत नाही. कारण हा एक ऑप्टिकल इल्यूजन फोटो आहे. बघा तुम्हाला या फोटोत काय दिसतं.