या फोटोत लपल्या आहेत दोन मांजरी, आतापर्यंत 90 टक्के लोक ठरले अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 12:39 PM2022-09-01T12:39:29+5:302022-09-01T12:44:06+5:30
Optical Illusion : या फोटोत एक परिवार एका रूममध्ये बसलेला आहे. तुमच्यासाठी चॅलेंज हे आहे की, या फोटोत दोन मांजरीही आहेत. ज्या तुम्हाला शोधायच्या आहेत.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो सोशल मीडिया यूजर्सना नेहमीच चक्रावून सोडतात. कारण यात जे दिसतं ते तसं नसतं. हे फोटो भ्रम निर्माण करतात. अनेक या फोटोंमधील रहस्य लोकांना दिसून येत नाही. इथे लोकांच्या बुद्धीमत्तेचा आणि नजरेचा कस लागतो. कारण या फोटोमध्ये काहीना काही लपलेलं असतं. या फोटोत एक परिवार एका रूममध्ये बसलेला आहे. तुमच्यासाठी चॅलेंज हे आहे की, या फोटोत दोन मांजरीही आहेत. ज्या तुम्हाला शोधायच्या आहेत.
हाय इंटेलिजन्स असलेले लोकच हे ऑप्टिकल इल्यूजन सॉव्ह करू शकतात. कारण आतापर्यंत या फोटोतील माजंरींना केवळ 1 टक्के लोकच 20 सेकंदात शोधू शकले आहेत. या फोटोत एक व्यक्ती सोफ्यावर बसून पेपर वाचत आहे. त्याची पत्नी त्याच्यासमोर एका खुर्चीवर बसली आहे. तर त्यांची मुलगी खाली जमिनीवर खेळत आहे. या फोटोबाबत दावा करण्यात आला आहे की, केवळ 1 टक्के लोकच या फोटोत लपलेल्या माजरींना शोधू शकले आहेत. हा ऑप्टिकल इल्यूजन असलेला फोटो सोशल मीडियावर हेक्टिक निक नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे.
हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो तुमची आयक्यू टेस्ट करण्यासाठी एक मजेदार पद्धत आहे. रूममध्ये लपलेल्या मांजरी शोधणं फार अवघड काम आहे. कारण त्या रूमच्या बॅकग्राउंडमध्ये लपल्या आहेत. पती, पत्नी आणि त्यांची मुलगी सहजपणे फोटोत दिसते. पण लपलेल्या मांजरी शोधणं अवघड आहे. अशात तुमच्या नजरेचा कस लागणार आहे.