Optical Illusion: या फोटोत लपले आहेत दोन जग्वार, 13 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 10:13 AM2022-09-26T10:13:16+5:302022-09-26T11:23:12+5:30
Optical Illusion : या फोटोतील रहस्य तुम्हीही शोधू शकता आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही यातील जग्वार शोधण्याचं चॅलेंज देई शकता. याने तुमचा वेळही चांगला जाईल आणि तुमच्या डोळ्यांची टेस्टही होईल.
Optical Illusion Jaguar: ऑप्टिकल इल्यूजन टेस्ट आपल्या मेंदूला कन्फ्यूज करतात आणि आपल्या दृष्टीची टेस्टही घेतली जाते. यांचं डिझाइनच तसं केलेलं असतं. या ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंजमध्ये तुम्हाला जंगलातील दोन जग्वार शोधायचे आहेत. या फोटोतील रहस्य तुम्हीही शोधू शकता आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही यातील जग्वार शोधण्याचं चॅलेंज देई शकता. याने तुमचा वेळही चांगला जाईल आणि तुमच्या डोळ्यांची टेस्टही होईल.
ब्रिटीश फोटोग्राफर मार्टिन कारपेंटर यांनी हा फोटो क्लिक केला आहे. हा फोटो ब्राझीलच्या पंतनलमधील जंगलातील आहे. या फोटोत तुम्हाला एक जग्वार स्पष्टपणे दिसतोय, पण तुम्हाला यातील दुसरा जग्वार शोधायचा आहे. जे काही सोपं काम नाही. त्यासाठी तुमच्याकडे चांगली दृष्टी असणं गरजेचं आहे. याच झुडपांमध्ये दुसराही जग्वार आहे. जो सहजपणे दिसत नाही. त्याला शोधणंच स्किल आहे. त्याला शोधण्यासाठी तुम्ही 13 सेकंदाचा वेळ घ्या.
जगुआर मांजरीच्या प्रजातींपैकी एक शक्तीशाली आहे. जो आपल्या जोरदार हल्ल्यासाठी ओळखला जातो. हा एकमेव असा जीव आहे जो अमेरिकन महाद्वीपाचा मूळ निवासी आहे. जर तुम्हाला बराच वेळ होऊनही यातील जग्वार दिसला नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. दुसरा जग्वार तुम्ही फोटोच्या डाव्या बाजूला शोधू शकता. तुम्हाला अजूनही जग्वार दिसला नसेल तर तुम्ही खाली बघू शकता.