या फोटोत आहे एक चूक, 99 टक्के लोक ती शोधण्यात झाले फेल; तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 10:46 AM2023-11-17T10:46:38+5:302023-11-17T10:47:10+5:30
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो तुमच्या डोळ्यांसमोर आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे यात जे असतं ते दिसत नाही जे दिसतं ते तसं नसतं.
Find Out Mistake In Picture: मेंदुचा जेवढा जास्त वापर केला जाईल तो तेवढा जास्त शार्प होतो. जर दररोज तुम्ही पझल्स,क्वीज गेम्स खेळले तर तुमच्या मेंदुची चांगली कसरत होते. यासाठी ऑप्टिकल इल्यूजन फोटो चांगला पर्याय ठरू शकतात. हे फोटो फारच कन्फ्यूज करणारे असतात. यात काही गोष्टी लपलेल्या असतात ज्या शोधण्यात तुमची कसरत होते. तर कधी कधी यात चुकाही शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो तुमच्या डोळ्यांसमोर आणि मेंदुसमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे यात जे असतं ते दिसत नाही जे दिसतं ते तसं नसतं. यात नेमकं काय आहे शोधण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते आणि त्यासाठी एक ठराविक वेळही असते. तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक सुंदर घर दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला झाडी आहेत. पण या फोटोत एक चूक आहे. जी तुम्हाला शोधायची आहे.
आम्हाला आशा आहे की, तुम्हाला 7 सेकंदात या फोटोतील चूक आढळून आली असेल. ज्यांना यातील चूक दिसली त्यांचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण ज्यांना अजूनही यातील चूक दिसली नसेल त्यांनी निराश होऊ नये. यातील चूक शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही चूक बघू शकता.