Optical Illusion: कन्फ्यूज करणाऱ्या या फोटोत तुम्हाला सर्वातआधी काय दिसतं? जाणून घ्या उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 03:18 PM2022-04-12T15:18:41+5:302022-04-12T15:58:15+5:30
सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या ऑप्टिकल इल्यूजन असलेल्या इमेज व्हायरल होत आहेत. नेटिझन्सही असे फोटो पाहून प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात.
Optical Illusion Viral Photo: अनेक फोटोंमध्ये ज्या गोष्टी दिसतात त्या प्रत्यक्षात तशा नसतात. त्या समजून घेण्यासाठी डोक्याला जरा जास्त चालवावं लागतं. अशाच फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हणतात. सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या ऑप्टिकल इल्यूजन असलेल्या इमेज व्हायरल होत आहेत. नेटिझन्सही असे फोटो पाहून प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑप्टिकल इल्यूजन फोटोने लोकांना चक्रावून सोडलं आहे. हा फोटो The Blondie Boys Shorts नावाच्या ब्लॉगरने शेअर केला आहे. अनेकांना पहिल्यांदा या फोटोत पांढरे कपडे घातलेले काही लोक दिसत आहेत. तर काहींना पहिल्यांदा यात डोंगराहून येणार पाणी म्हणजे धबधबा दिसत आहे. फोटो शेअर करत ब्लॉगरने लिहिलं आहे की, 'जर तुम्ही आधी धबधबा पाहिला तर याचा अर्थ तुम्ही लोकांसोबत सहजपणे मिसळता'.
The Blondie Boys Shorts द्वारे समजावण्यात आलं की, जर तुम्हाला धबधबा दिसत असेल तर यावरून हे दिसतं की, तुम्ही समाजातील लोकांना वेळ देता. पण जर तुम्हाला स्वत:साठी वेळ घालवण्याची संधी मिळाली तर तुमची तिथे जाण्याची इच्छा होईल.
ब्लॉगरने असंही सांगितलं की, जर तुम्हाला फोटोत आधी धबधबा दिसण्याऐवजी लोक पांढऱ्या कपड्यात दिसले तर याचा अर्थ होतो की तुम्हाला वर्तमान जीवनात कुठेतरी हरवल्यासारखं वाटत आहे आणि तुम्हाला हे माहीत नाही की, तुम्ही कुठे जात आहात. पण सकारात्मक बाब ही आहे की, तुम्ही तुमच्या जीवनात तुमचं लक्ष्य मिळवण्यासाठी दृढ आहात.