Optical Illusion: या चित्रात तुम्हाला पहिले काय दिसले? वाघ, माकड की भलतेच काही; स्वत:च स्वत:ला ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 04:24 PM2022-04-29T16:24:05+5:302022-04-29T16:25:16+5:30

Optical Illusion: तुम्हाला गोष्टी पूर्ण करण्याआधी टू-डू लिस्टमध्ये प्लॅन करायला आवडते. तुम्ही निष्कर्ष काढण्यापूर्वी निरीक्षण आणि विश्लेषण करता.

Optical Illusion: What did you see first in this picture? tiger or a monkey; Get to know yourself | Optical Illusion: या चित्रात तुम्हाला पहिले काय दिसले? वाघ, माकड की भलतेच काही; स्वत:च स्वत:ला ओळखा

Optical Illusion: या चित्रात तुम्हाला पहिले काय दिसले? वाघ, माकड की भलतेच काही; स्वत:च स्वत:ला ओळखा

googlenewsNext

आपल्या मेंदूला डाव्या आणि उजव्या अशा दोन बाजू असतात, ज्या वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत असतात. आपला विचार करण्याची पद्धत आपल्या मेंदूची कोणती बाजू प्रबळ आहे यावर अवलंबून असते. मेंदूच्या एका बाजूने ओळखता येण्याजोगा गुण आपल्याकडे असेल व एकच बाजू काम करेल असे नसते. काहीवेळा दोन्ही बाजू काम करतात आणि दोन वेगवेगळ्या गोष्टी सुचवू शकतात. म्हणजेच भ्रम निर्माण करू शकतात. 

आजची हा ऑप्टिकल इल्युजनचा फोटो तुम्हाला तुमची कोणती बाजू प्रबळ आहे आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये कोणती हे सांगणार आहे. यासाठी तुम्हाला कोणता प्राणी पहिला दिसला हे पाहणे गरजेचे आहे. 

जर तुम्हाला वाघाचे डोके प्रथम दिसले तर तुमच्या मेंदूची उजवी बाजू प्रबळ आहे असे समजावे. निर्णय घेण्यापूर्वी योजना आणि विश्लेषण करायला आवडते. खूप तार्किक आणि गणनात्मक विचार करून निर्णय घेतल्यामुळे, तुम्ही अविचल राहण्याचा आणि इतरांच्या मतांकडे दुर्लक्ष करता.

तुम्हाला गोष्टी पूर्ण करण्याआधी टू-डू लिस्टमध्ये प्लॅन करायला आवडते. तुम्ही निष्कर्ष काढण्यापूर्वी निरीक्षण आणि विश्लेषण करता. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही तथ्यांवर आधारित निर्णय घेता.
जर तुम्हाला लटकलेले माकड पहिले दिसले तर तुमचे मन सर्जनशील आहे. तुम्ही गंभीर विचार करण्याऐवजी तुमच्या अंतर्ज्ञानावर आधारित निर्णय घेता. तुम्ही उत्स्फूर्त निर्णय घेता आणि चौकटीच्या बाहेर दृष्टीकोन ठेवता. तुम्ही भावनिक आहात आणि निर्णय घेण्यापूर्वी जास्त विचार करण्यात वेळ घालवता.

Web Title: Optical Illusion: What did you see first in this picture? tiger or a monkey; Get to know yourself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ