Optical Illusion: डोळे तीक्ष्ण असतील तरच शोधू शकाल यातील बदक, पण हे इतकंही सोपं नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 09:23 AM2023-01-07T09:23:14+5:302023-01-07T09:25:13+5:30
Optical Illusion : हे फोटो आपल्याला विश्वास देतात की, तुम्ही जे बघत आहात तेच सत्य आहे. पण ते अजिबात तसं नसतं. असाच फोटो आम्ही घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला एक बदक शोधायचं आहे.
Find Duck in the Photo : सोशल मीडियावर रोज वेगवेगळे मजेदार फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही ऑप्टिकल इल्यूजन फोटो असतात. ऑप्टिकल इल्यूजनने आपलं मनोरंजनही होतं आणि डोळ्यांची टेस्टही होते. कारण यात जे दिसतं ते नसतं किंवा यातील रहस्य तुम्हाला शोधायचं असतं. हे फोटो आपल्याला विश्वास देतात की, तुम्ही जे बघत आहात तेच सत्य आहे. पण ते अजिबात तसं नसतं. असाच फोटो आम्ही घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला एक बदक शोधायचं आहे.
या फोटोत तुम्हाला एक टब दिसत आहे. ज्या कपडे धुण्याची तयारी केली जात आहे. त्यातून काही बुडबुडे निघत आहेत. काही लहान काही मोठे बुडबुडे आहेत. त्यातच एक बदक तयार करण्यात आलं आहे. जे तुम्हाला शोधायचं आहे. पण हे काम इतकं सोपं नाही. त्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असायला हवी. तरच ते शक्य आहे.
या फोटोची मजेदार बाब म्हणजे यात तुम्हाला बदक सहजपणे दिसणार नाही. या बुडबुड्यांमध्ये ते तुम्हाला शोधायचं आहे. बारकाईने आणि डोकं शांत ठेवून बघाल तर ते नक्कीच तुम्हाला दिसेल.
बदक या बुडबुड्यांपैकी एका बुडबुड्यात तयार करण्यात आलं आहे. बारकाईने बघा की, टबच्या उजवीकडे खाली एक बुडबुडा आहे. ज्यात तुम्हाला बदक दिसलं असेल.