Optical Illusion: फोटोत तुम्हाला कोणता रंग दिसला, त्यावरून कळेल तुम्ही GENIUS आहात की नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 11:12 AM2022-07-16T11:12:46+5:302022-07-16T11:14:27+5:30
Trending Optical Illusion: जर तुम्ही काही वेळ फोटोच्या मधोमध बघत राहिलात तर तुम्हाला यात दोन रंग दिसण्याची जास्त शक्यता आहे. एक निळा आणि एक लाल. तसा तर प्रत्येकाच्या आत एक जीनिअस लपलेला असतो.
Trending Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजन फारच मजेदार असतं. अनेकदा लोक यात इतके गुंततात की, त्यांना त्यातील उत्तर सापडत नाही. तर काही लोक सहजपणे यातील गुपित शोधून काढतात. जर तुम्हालाही तुमची आयक्यू लेव्हल टेस्ट करायची असेल या ऑप्टिकल इल्यूजनकडे बारकाईने बघा. फोटोच्या मधोमध बघितल्यावर तुम्हाला यात एक रंग दिसेल. हा रंग तुमचा आयक्यू लेव्हलचा खुलासा करण्यास मदत करेल.
जर तुम्ही काही वेळ फोटोच्या मधोमध बघत राहिलात तर तुम्हाला यात दोन रंग दिसण्याची जास्त शक्यता आहे. एक निळा आणि एक लाल. तसा तर प्रत्येकाच्या आत एक जीनिअस लपलेला असतो. पण सर्वांची कॅटेगरी आणि एक्सपर्टीज वेगळ्या असतात. माइंड्स जर्नलनुसार, जर तुम्हाला निळा रंग दिसला तर तुम्ही परसेप्शनचे जीनिअस आहात आणि जर तुम्हाला आधी लाल रंग दिसला तर तुम्ही लॉजिकचे जीनिअस आहात.
निळ्या आणि लाल रंगाचा अर्थ
निळ्या रंगाचा अर्थ जीनिअस ऑफ परसेप्शन म्हणजे ब्रेन वेव्हची फ्रीक्वेन्सी 100-120 हर्ट्ज दरम्यान आहे. तुमच्याकडे मेंटल क्लॅरिटी आहे आणि तुम्ही जीवनाच्या कॉन्सेप्टला चांगल्या प्रकारे समजता. त्यामुळे कठिण निर्णय घेण्यात तुम्हाला काही अडचण येत नाही. तेच लाल रंगाचा अर्थ जीनीअस ऑफ लॉजिक होतो. म्हणजे ब्रेन वेव्हची फ्रीक्वेन्सी 150-180 हर्ट्ज आहे. तुमच्या सरासरीपेक्षा जास्त बुद्धी आहे आणि समस्यांचं समाधान शोधणं हे तुमच्यासाठी अवघड नाही.
या ऑप्टिकल इल्यूजनमधून हे समजतं की, निळा रंग दिसणारा व्यक्ती एक चांगला कार्यकर्ता आणि एक चांगला टीम खेळाडू आहे. दुसरे लोक या व्यक्तीवर विश्वास ठेवतात. जर तुम्ही लाल रंग बघणाऱ्यांमध्ये असाल तर लोक अडचणीत असतील तर तुमची वाट बघतात. दुसऱ्यांवर तुमचा प्रभाव जास्त असतो.