Optical Illusion: महिलेचा चेहरा कोणत्या बाजूने आहे? बरोबर उत्तर देण्यात व्हाल कन्फ्यूज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 10:34 AM2022-10-11T10:34:02+5:302022-10-11T10:36:01+5:30
Optical Illusion : आश्चर्य हे आहे की, आम्ही सतत दोन चेहऱ्यावर जोर का देत आहोत? याचं कारण आम्ही तुमच्यासाठी एक असा फोटो घेऊन आलो जो तुमच्या डोळ्यांना आणि मेंदूला कन्फ्यूज करतो.
Optical Illusion Two Faces: सगळ्यांनाच दोन चेहरे असतात. एक तो जो सगळ्या जगाला आपण दाखवतो आणि एक तो जो दिसत नाही. ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो फारच चतुराईने डिझाइन करण्यात आला आहे. यात दोन चेहरे दिसतात. एक चेहरा तो जो केवळ आपल्याला माहीत असतो. तो आपण जगापासून लपवतो. दुसरा चेहरा सावलीसोबत येतो. दुसरा चेहरा आपला खरेपणा, आपले दु:खं, आपल्या इच्छा आणि आपल्या प्रवृतींबाबत सांगतो.
महिला पुढे बघत आहे की, बाजूला?
आश्चर्य हे आहे की, आम्ही सतत दोन चेहऱ्यावर जोर का देत आहोत? याचं कारण आम्ही तुमच्यासाठी एक असा फोटो घेऊन आलो जो तुमच्या डोळ्यांना आणि मेंदूला कन्फ्यूज करतो. तुमचं उत्तर काही असो, तुम्ही ते बरोबरच देत आहात. म्हणजे दोन्हीकडे दिसणारा चेहरा बरोबर आहे. हा फोटो तुमच्या व्यक्तीत्वाबाबत सांगतो. फक्त तुमच्या मेंदूसोबत खेळलं जात आहे.
आपला मेंदू स्मार्ट आहे. पण कधी कधी अशा परिस्थितीत आंधळाही होतो. आपले डोळे आपल्या मेंदूला आजूबाजूचं बघण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी संकेत देतात. अनेकदा आपले डोळे आणि मेंदूमध्ये चुकीचं कम्युनिकेशन होऊ शकतं. अनेकदा मेंदूला हे समजत नाही की, डोळ्यांना काय सांगायचं आहे. अशावेळी मेंदूचं कन्फ्यूजन होतं. म्हणून ऑप्टिकल इल्यूजन फोटो बघताना असं होतं.