Optical Illusion: हा फोटो पाहून अनेकांचं डोकं चक्रावलं, त्यांना लागला नाही पायऱ्यांचा काही मेळ....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 11:38 AM2022-05-04T11:38:15+5:302022-05-04T11:42:43+5:30
Optical Illusion Viral Photo: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अशाच एका फोटोने सध्या लोकांना हैराण केलं आहे.
Optical Illusion Viral Photo: आर्टिस्ट अनेकदा मनुष्यांच्या मनाला आव्हान देण्यासाठी ऑप्टिकल इल्यूजनच्या शक्तीचा वापर करतात. त्यांची ही कलात्मकता आपल्याला थक्क करते आणि थोडावेळ चक्रावून सुद्धा सोडते. अनेकदा फोटोत जे दिसतं ते प्रत्यक्षात नसतंच. ते समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या डोक्यावर जोर द्यावा लागतो. अशाच फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अशाच एका फोटोने सध्या लोकांना हैराण केलं आहे.
ऑप्टिकल इल्यूजन असलेला हा फोटो तुम्हाला वास्तविकतेवर प्रश्न उठवण्यासाठी प्रेरित करेल. काही लोकांचं डोकं हा फोटो पाहून चक्रावून जाईल. या फोटोवर एक नजर टाका आणि सांगा की, पायऱ्या कोणत्या दिशेने ता आहेत?
या फोटोत एक असं विश्व दिसतं जिथे गुरूत्वाकर्षणाचा नियम लागू नसतो. डच ग्राफिक कलाकार एमसी एस्चर यांनी तयार केलेली लिथोग्राफ प्रिंट एका समुदायाच्या लोकांच्या व्यवसायाला दाखवतो. फोटोत प्रत्येक ग्रॅव्हिटी सोर्समध्ये १६ लोकांना दाखवलं आहे. एकात सहा आणि इतर दोनमध्ये दहा. इल्यूजन यामुळे तयार होतं कारण तीन गुरूत्वाकर्षण स्त्रोतांना एकाच स्थानी दर्शवण्यात आलं आहे.
सर्वात मोठं इल्यूजन सात पायऱ्या आहेत. जर तुम्ही वरच्या पायऱ्या बघाल तर दोन लोक त्यांचा वापर करत आहेत. एका चढत आहे तर दुसरा उतरत आहे. उजवीकडील पायऱ्यांवरून एक व्यक्ती उलटा उतरताना दिसत आहे. पण ते हे सामान्य रूपाने आपल्या गुरूत्वाकर्षणाच्या स्त्रोताच्या आधारावर करत आहेत.