Optical Illusions : LION चे बरोबर स्पेलिंग कुठे लिहिले आहे? घारीची नजर असलेलेच ओळखू शकतात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 12:49 PM2023-04-05T12:49:46+5:302023-04-05T12:50:28+5:30

आपल्याला ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो समोर येत असतात.

Optical Illusions : Where is LION spelled correctly? Only those with a keen eye can recognize it | Optical Illusions : LION चे बरोबर स्पेलिंग कुठे लिहिले आहे? घारीची नजर असलेलेच ओळखू शकतात

Optical Illusions : LION चे बरोबर स्पेलिंग कुठे लिहिले आहे? घारीची नजर असलेलेच ओळखू शकतात

googlenewsNext

आपल्याला ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो समोर येत असतात. या सारखे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात स्पेलिंग ओळखण्याचे चॅलेंज दिले आहे. यात स्पेलिंग चुकीचे आहे किंवा इकडे तिकडे लिहिले आहे. ते शोधण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत. यात तुम्हाला सिंहाचे अचूक स्पेलिंग शोधावे लागणार आहे.

या फोटोत खास गोष्ट म्हणजे यात एक वगळता सिंहाचे सर्व स्पेलिंग चुकीचे लिहिले आहेत. एकच शब्द आहे ज्यामध्ये सिंहाचे स्पेलिंग बरोबर आहे, तो शब्द शोधून सांगावा लागणार आहे. विशेष म्हणजे या फोटोत सिंहाचा फोटोही लावण्यात आला आहे. फोटोत तुम्ही एक मोठा सिंह पाहू शकता.

कोट्यधीश पण आई वडिलांसमोर गरिबीचं नाटक करतो; कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल

या फोटोत ११ कॉलम दिसत आहेत. यामध्ये फक्त सिंहाचे स्पेलिंग लिहिल्याचे दिसत आहे. पण, या सर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्वांमध्ये स्पेलिंग चुकीचे लिहिलेले आहे, या कॉलममध्ये मध्यभागी एकाच ठिकाणी स्पेलिंग बरोबर आहे आणि तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर १० सेकंदात द्यायचे आहे. 

यात उत्तर खूप सोपे आहे पण अवघड गोष्ट अशी आहे की ती म्हणजे स्पेलिंग कमी वेळात शोधावे लागणार आहे. याच उत्तरही जाणून घ्या. यातील मधल्या स्तंभातील सिंह या शब्दाचे अचूक स्पेलिंग आहे. यात सहाव्या स्तंभातील वरती असलेले सहावे अक्षर, जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला अचूक स्पेलिंग मिळेल.

Web Title: Optical Illusions : Where is LION spelled correctly? Only those with a keen eye can recognize it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.