ऑर्डर केला लॅपटॉप, बॉक्स उघडताच ग्राहकाला बसला धक्का! वाचा नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 05:12 PM2022-10-25T17:12:49+5:302022-10-25T17:14:53+5:30
सध्या ई-कॉमर्सच्या कंपन्या वाढल्या आहेत. यावरुन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचेही प्रमाण वाढले असून या कंपन्या ऑफर्सही मोठ्या प्रमाणात देत आहेत.
सध्या ई-कॉमर्सच्या कंपन्या वाढल्या आहेत. यावरुन खरेदी करणाऱ्या ग्राहकांचेही प्रमाण वाढले असून या कंपन्या ऑफर्सही मोठ्या प्रमाणात देत आहेत. पण ई-कॉमर्सवरुन अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. फ्लिपकार्टवर सेलमध्ये एका व्यक्तीने गेमिंग लॅपटॉपची ऑर्डर दिली आणि ऑर्डर मिळाल्यावर तो बॉक्स उघडला तर ग्राहकाला धक्काच बसला.
घरी आलेला बॉक्स उघडल्यानंतर यात लॅपटॉप नाही तर एक मोठा दगड असल्याचे समोर आले. फ्लिपकार्ट सेलमध्ये कर्नाटकातील मंगळूर येथे राहणाऱ्या चिन्मय नावाच्या व्यक्तीने गेमिंग लॅपटॉप ऑर्डर केला. ऑर्डर मिळाल्यानंतर बॉक्स उघडला असता त्या बॉक्समध्ये संगणकाचे काही जुने भाग आणि काही ई-कचरा पडून असल्याचे दिसून आले.
WhatsAppचे वाजले बारा; युजर्संनी भन्नाट मीम्स केल्या शेअर
मंगलोरमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. या व्याक्तीने ही माहिती ट्विटवरून दिली. चिन्मयने १५ ऑक्टोबर त्याच्या मित्रासाठी Asus TUF गेमिंग F15 गेमिंग लॅपटॉप ऑर्डर केला आणि २० ऑक्टोबर रोजी लॅपटॉप पोहोच झाला.
हे फ्लिपकार्ट प्लस अॅश्युअर्ड होते, पण यासोबत ओपन बॉक्स डिलिव्हरी पर्याय उपलब्ध नव्हता. बॉक्स बाहेरून चांगला दिसत होता, त्यामुळे त्याने डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला ओटीपी सांगितला. बॉक्स उघडताच ही गोष्ट लक्षात आली.
आसूसचा बॉक्स उघडून पाहिला असता त्या बॉक्समध्ये संगणकाचे काही जुने भाग व दगडांसह ई-कचरा पडून असल्याचे दिसून आले. या बॉक्समध्ये दगडही ठेवण्या आला होता.
Ordered for laptop and recived a big stone and E-waste ! During Diwali sale on Flipkart!@VicPranav@geekyranjit@ChinmayDhumal@GyanTherapy@Dhananjay_Tech@technolobeYT@AmreliaRuhez@munchyzmunch@naman_nan@C4ETech@r3dash@gizmoddict@KaroulSahil@yabhishekhd@C4EAshpic.twitter.com/XKZVMVd4HK
— Chinmaya Ramana (@Chinmaya_ramana) October 23, 2022
यानंतर त्याने फ्लिपकार्टकडे तक्रार केली. पण फ्लिपकार्टने विक्रेत्याशी संपर्क साधला तेव्हा विक्रेत्याने हे स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला. आम्ही लॅपटॉप व्यवस्थित पाठवला होता असं त्यांनी सांगितले.