बंदुकीच्या गोळ्यांसोबत 'ती' अदांनीही करते घायाळ; इस्रायल आर्मीतील सैनिक झाली मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 02:16 PM2019-05-18T14:16:24+5:302019-05-18T14:59:03+5:30

'क्वीन ऑफ गन्स'च्या नावाने लोकप्रिय ओरिन ज्यूली कोणत्याही सिनेमाची हिरोईन नाहीये.

Orin Julie became star overnight now called as queen of guns | बंदुकीच्या गोळ्यांसोबत 'ती' अदांनीही करते घायाळ; इस्रायल आर्मीतील सैनिक झाली मॉडेल

बंदुकीच्या गोळ्यांसोबत 'ती' अदांनीही करते घायाळ; इस्रायल आर्मीतील सैनिक झाली मॉडेल

Next

'क्वीन ऑफ गन्स'च्या नावाने लोकप्रिय ओरिन ज्यूली कोणत्याही सिनेमाची हिरोईन नाहीये. ती इस्त्राइलची माजी सैनिक आहे. ती दिसायला जेवढी सुंदर आहे, तेवढीच ती शस्त्र चालवण्यात तरबेज आहे. 

ओरिनबाबत असं म्हटलं जातं की, तिला शस्त्रांची फार आवड आहे आणि तिने जगातले एकापेक्षा एक शस्त्र चालवली आहेत. हे तुम्ही या फोटोंमध्ये बघू शकता. इतकी सुंदर असूनही तुम्ही तिला फोटोंमध्ये जगातल्या हायटेक शस्त्रांस्त्रांसोबत बघू शकता. 

२५ वर्षीय ओरिन ज्यूली २०१२ मध्ये इस्त्राइल डिफेंस फोर्सेजमध्ये दाखल झाली होती. तर २०१३ मध्ये इस्त्रायल सेनेने ओरिनला वेगवेगळ्या सैन्य अभियानात सक्रिय भूमिका निभावण्याची संधी दिली होती. ओरिनने ३ वर्ष इस्त्राइलच्या सेनेत कॉम्बॅट सोल्जर म्हणूण काम केलं. यादरम्यान अनेक प्रमुख अभियांनामध्ये ती सहभागी होती. 

 

सेनेत असतानाच ओरिन नेहमीच तिच्या सैन्याच्या वेशभूषेतील फोटो सोशल मीडियात शेअर करत होती. त्यामुळे ती रोतारात स्टार झाली. इतकेच नाही तर तिला इस्त्राइलच्या शस्त्रास्त्रांच्या सर्वात मोठ्या डीलरने मॉडलिंगची ऑफरही दिली होती. नंतर तिने सेना सोडली आणि मॉडलिंगसाठी होकार दिला. गेल्या ४ वर्षांपासून ते एका कंपनीसाठी मॉडेलिंग करत आहे. 

ओरिन नुकतीच अमेरिकेतील आर्म्स लॉचं कौतुक केल्याने चर्चेत आली होती. तिला वाटतं की, इस्त्राइलमध्येही असाच कायदा असला पाहिजे. कारण इस्त्राइलमध्ये शस्त्रास्त्र ठेवण्याची परवानगी नाही. 

Web Title: Orin Julie became star overnight now called as queen of guns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.