पाकिस्तानी मुलीने गायलं भारतीय गायकाचं गाणं, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मिळाली शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 02:06 PM2018-09-06T14:06:38+5:302018-09-06T14:08:58+5:30

शेजारी देशातही कलाकारांची आणि गायकांची मोठी फॅन फॉलोईंग आहे. पण एका मुलीला आपली 'फॅनगिरी' चांगलीच महागात पडली आहे. 

Pakistan airport security force staff punished for singing Guru Randhawa song | पाकिस्तानी मुलीने गायलं भारतीय गायकाचं गाणं, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मिळाली शिक्षा!

पाकिस्तानी मुलीने गायलं भारतीय गायकाचं गाणं, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मिळाली शिक्षा!

Next

पाकिस्तानात बॉलिवूड सिनेमे, अभिनेते आणि गायक चांगलेच लोकप्रिय आहेत. शेजारी देशातही कलाकारांची आणि गायकांची मोठी फॅन फॉलोईंग आहे. पण एका मुलीला आपली 'फॅनगिरी' चांगलीच महागात पडली आहे. 

पाकिस्तानच्या सियारकोटची राहणारी २५ वर्षीय मुलीचा एक व्हिडीओ तीन महिन्यांपूर्वी सोशल मीडियात व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये ती प्रसिद्ध गायक गुरु रंधावा यांच 'हायरेटेड गबरु' हे गाणं गाताना दिसली आहे. भलेही तिचं हे गाणं ऐकून लोकांचं मनोरंजन झालं असेल पण या गाण्याच्या नादात तिच्याकडून एक मोठी चूक झाली आहे.  

काय झाली चूक?

ही मुलगी पाकिस्तान एअरपोर्ट सुरक्षा दलाची कर्मचारी आहे. या व्हिडीओमध्ये तिने एक टोपी परिधान केलेली दिसते आहे. टोपीवर पाकिस्तानचा झेंडा आहे. इतकेच नाही तर सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांवर सोशल मीडियाची बंदी घालण्यात आली आहे. असे असूनही तिने लिप सिंक बॅटलमध्ये भागही घेतला आणि आपला व्हिडीओ सोशल मीडियात अपलोडही केला. 

मिळाली कठोर शिक्षा

आता या मुलीला कठोर शिक्षा मिळाली आहे. तिच्या पगारा वाढीत आणि भत्त्यांमध्ये दोन वर्ष बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नाही तर तिला हा इशाराही देण्यात आला आहे की, जर भविष्यात तिने आचार संहितेचं उल्लंघन केलं तर यापेक्षा कठोर शिक्षा मिळेल. 

Web Title: Pakistan airport security force staff punished for singing Guru Randhawa song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.