Pakistan News: पाकिस्तानी महिला अँकरने टीव्ही शोमध्ये विचारले असे प्रश्न, आता लोक उडवताहेत खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 07:25 PM2021-09-05T19:25:19+5:302021-09-05T19:26:49+5:30
Pakistani Anchor Nida Yasir viral Video: पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील अँकर निदा यासिर हिची सध्या सोशल मीडिया युझर्सकडून मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात येत आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील अँकर निदा यासिर हिची सध्या सोशल मीडिया युझर्सकडून मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात येत आहे. (Pakistani Anchor Nida Yasir viral Video) निदा यासिर हिने आपल्या मुलाखतीमध्ये असे काही म्हटले होते की, ज्यामुळे तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. ( Pakistan News) एवढेच नाही तर पाकिस्तानमध्येही तिच्या मुलाखतीच्या व्हिडीओची खिल्ली उडवली जात आहे. नेमकं काय प्रकरण आहे, ते आता जाणून घेऊयात. (Questions asked by a Pakistani female anchor in a TV show, now people are laughing)
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अँकर निदा यासिर दोन जणांची मुलाखत घेत आहे. यादरम्यान, फॉर्म्युला -१ रेज कारचा उल्लेख होतो. त्यावर निदा जे काही म्हणते ते ऐकून पाहुण्यांनीही डोक्याला हात लावला. फॉर्म्युला -१ बाबत निदा जे काही म्हणते ते ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. फॉर्म्युला-१ रेस कारबाबत निदा पाहुण्यांना जे प्रश्न विचारते की, त्यांना हसणे रोखता येत नाही. निदा त्यांना विचारते की, या गाडीमधून किती लोक येऊ शकतात. तर कधी विचारते की, तुम्ही आता लहान गाडीपासून सुरुवात केली आहे का. यावर पाहुणे म्हणतात की, ही फॉर्म्युला-१ कार आहे. त्यामुळे यामध्ये एकच माणूस बसू शकतो. त्यावर अँकर निदा यासिर म्हणते की, हा तर तुम्ही आताच फॉर्म्युला तयार केला आहे. तुम्ही आतापर्यंत त्याची चाचणी घेतली आहे की नाही. शेवटी ती त्या पाहुण्यांना विचारते की, ही गाडी नेमकी किती वेगाने धावते.
Why this lady didn't Google what Formula 1 is before the show? pic.twitter.com/5rhsFpyuWD
— Ali Qasim (@aliqasim) September 4, 2021
मात्र निदा यासिर हिची ही मुलाखत खूप जुनी आहे. ज्याची क्लिप आता व्हायरल होऊ लागली आहे. समा न्यूज वेबसाईटच्या म्हणण्यानुसार गुड मॉर्निंग पाकिस्तान कार्यक्रमाची होस्ट निदा तिच्या शोमधील एक जुनी क्लिप व्हायरल झाल्याने ट्विटरवर टॉप ट्रेंड बनली आहे. तिची ही मुलाखत २०१६ मध्ये प्रसारित झाली होती.
सध्यातरी ३५ सेकंदांची क्लिप व्हायरल होत आहे. ही क्लिप ट्विटरवर एका व्यक्तीने अकाऊंटवर शेअर केली आहे. कार्यक्रम होस्ट करण्यापूर्वी या महिलेने फॉर्म्युला-१ बाबत गुगलवर सर्च का नाही केलं? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओवर युझर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.