"तो निळ्या डोळ्यांचा चहावाला आठवतोय का?"; मॉडेलिंगनंतर आता लंडनमध्ये सुरू केलं 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 12:17 PM2023-07-19T12:17:47+5:302023-07-19T12:27:18+5:30

निळ्या डोळ्यांचा अर्शद खान ऑनलाईन सेन्सेशन बनला. तेव्हापासून त्याचं आयुष्य असं बदलले की अर्शदने कधीच मागे वळून पाहिलेच नाही.

pakistan viral blue eyed chaiwala arshad khan opens cafe in london | "तो निळ्या डोळ्यांचा चहावाला आठवतोय का?"; मॉडेलिंगनंतर आता लंडनमध्ये सुरू केलं 'हे' काम

"तो निळ्या डोळ्यांचा चहावाला आठवतोय का?"; मॉडेलिंगनंतर आता लंडनमध्ये सुरू केलं 'हे' काम

googlenewsNext

तुम्हाला पाकिस्तानचा तो चहावाला आठवतो का, ज्याने आपल्या निळ्या डोळ्यांनी इंटरनेटवर लोकांना वेड लावलं होतं. फोटोग्राफर जिया अलीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्यावर निळ्या डोळ्यांचा अर्शद खान ऑनलाईन सेन्सेशन बनला. तेव्हापासून त्याचं आयुष्य असं बदललं की अर्शदने कधीच मागे वळून पाहिलेच नाही. 2020 मध्ये अर्शदने इस्लामाबादमध्ये स्वतःचा चहा कॅफे सुरू केला. त्याचे तीन चहाचे कॅफे आहेत, दोन लाहोरमध्ये आणि एक मुरीमध्ये आहे. 

आता अर्शदने लंडनच्या इलफोर्ड लेनमध्ये एक कॅफे सुरू केला आहे. एएनआयच्या एका रिपोर्टनुसार, अर्शद म्हणाला, "माझ्या प्रवासाची तयारी सुरू आहे आणि मला माझ्या चाहत्यांसाठी चहा बनवायला आवडेल. मला लंडनला जाण्यासाठी हजारो विनंत्या आल्या आहेत. आमचे पहिले आंतरराष्ट्रीय चहाचे दुकान आता इलफोर्ड लेनवर आहे आणि याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया आधीच मोठ्या प्रमाणावर आहेत.

अर्शद म्हणाला, दुर्राणी बंधूंसोबत, आम्ही इलफोर्ड लेनपासून नवीन सुरुवात करण्याचं ठरवले कारण ते मोठ्या संख्येने पाकिस्तानी आणि भारतीयांचे घर आहे जे चहावर प्रेम करतात. मी वैयक्तिकरित्या लवकरच लंडनमध्ये येईन. अर्शदचं लंडनमधील कॅफेसाठी इन्स्टाग्रामवर chaiwalauk_ak नावाचं एक अकाऊंट देखील आहे, ज्यावर त्याने नवीन कॅफेबाबत अपडेट पोस्ट करायला सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे, फोटो पहिल्यांदा व्हायरल झाल्यानंतर, चहा विक्रेत्याला मॉडेलिंगची ऑफर देखील आली, ज्यामध्ये त्याने यूके स्थित कंपनीसाठी रॅम्प वॉक केला. आता व्हायरल चायवाला त्याच्या नवीन स्टोअरमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. याआधी अर्शदने त्याच्या पाकिस्तानमधील कॅफेबद्दलचा व्हिडिओ जारी केला होता. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्येही अर्शद त्याच्या कॅफेला भेट देतो. अर्शदने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असं दिसतं की त्याने आपली हेअर स्टाइलही बदलली आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाल्यानंतर अर्शदला यश मिळू लागले आणि आता तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला चहा विकण्याच्या तयारीत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: pakistan viral blue eyed chaiwala arshad khan opens cafe in london

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.