पाकिस्तानातील नवरीने लग्नात घातला १०० किलोचा लेहंगा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 05:47 PM2021-07-30T17:47:52+5:302021-07-30T17:49:52+5:30

पाकिस्तानात एका नवरीने तिच्या लग्नाच्या दिवशी १०० किलो वजनाचा लेहंगा घातला होता. हा लेहंगा वजनी असण्यासोबतच फार मोठाही होता.

Pakistani bride wore 100 kg weight lehenga in her wedding video viral | पाकिस्तानातील नवरीने लग्नात घातला १०० किलोचा लेहंगा, व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानातील नवरीने लग्नात घातला १०० किलोचा लेहंगा, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

प्रत्येक नवरी-नवरदेवाला त्यांचा लग्नाचा दिवस खास यादगार करायचा असतो आणि यासाठी ते लग्नात वेगवेगळे एक्सपरिमेंट्स करत असतात. या दिवसासाठी नवरी-नवरदेव ड्रेस, ज्वेलरी, एन्ट्री, डेकोरेशन इत्यादीवर भरमसाठ पैसा खर्च करतात. लग्नाच्या दिवशी सुंदर आणि वेगळी दिसण्यासाठी पाकिस्तानच्या एका नवरीने असं काही केलं जे पाहून लोक हैराण झाले. या नवरीने आपल्या लग्नासाठी जो लेहंगा बनवला तो पाहून लोक चक्रावून गेलेत.

पाकिस्तानात एका नवरीने तिच्या लग्नाच्या दिवशी १०० किलो वजनाचा लेहंगा घातला होता. हा लेहंगा वजनी असण्यासोबतच फार मोठाही होता. इतकंच काय तर स्टेजच्या जास्तीत जास्त भागावर लेहंगा पसरलेला होता आणि लेहंग्याचा काही भाग स्टेजच्या खालीही पसरला होता. 

रेड कलरच्या या लेहंग्यावर सुंदर कलाकुसर करण्यात आली आहे आणि त्यावर स्टोनही लावण्यात आले आहेत. या सुंदर लेहंग्यासोबत नवरीने सुंदर दागिनेही घातले आहेत. तर नवरदेवाने गोल्डन कलरची शेरवानी आणि राणी कलरचा फेटा घातला आहे. १०० किलोचा लेहंगा घातलेल्या या नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसा हा व्हिडीओ गेल्यावर्षीही व्हायरल झाला होता. 
 

Web Title: Pakistani bride wore 100 kg weight lehenga in her wedding video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.