'ट्रॉफी तुम्हालाच ठेवा, विराट कोहली आम्हाला द्या', पाकिस्तानातून आली ऑफर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 07:55 PM2022-11-09T19:55:31+5:302022-11-09T19:58:38+5:30
विराट कोहलीची फॅन फॉलोइंग काही कमी नाही. पाकिस्तानातून आलेली ही ऑफर बघुनच हे स्पष्ट दिसते की विराट कोहली चे जागतिक स्तरावर किती चाहते आहेत.
आपला देश सोडून परदेशात गेल्यावर आपण नेहमी सावध असतो. कोणावरही विश्वास ठेवताना मनात भीती असते. तर काही सुखद अनुभवही येत असतात. त्यात तुम्ही जर पाकिस्तानमध्ये गेलात तर मात्र मनात धाकधुक होणारच. असाच एक अनुभव आलाय एका पाकिस्तानी कुटुंबाला.
ताहिर खान हे हैदराबादमध्ये राहतात. ते आपल्या कुटुंबासह पाकिस्तानला गेले. तर तिथे आलेला सुखद अनुभव बघून तेही अक्षरश: भारावून गेले. खरेतर ताहिर खान यांच्या मुलीची टेनिस मॅच होती त्यासाठी हे कुटुंब पाकिस्तानात पोहोचले. तिथे त्यांनी एका स्थानिकाकडे लिफ्ट मागितली. तर त्या स्थानिकाने केलेले स्वागत भारावून टाकणारे होते. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ताहीर यांच्या मुलीची आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली होती. म्हणून हे कुटुंब इस्लामाबाद येथे पोहोचले. कुटुंबाने ज्याला लिफ्ट मागितली त्याला जेव्हा समजले की कुटुंब भारतातून आले आहे तसे त्याने आपल्या ऑफिसमध्ये येण्याचे आणि जेवणाचे आमंत्रण दिले. इहतिशाम उल हक या पाकिस्तानी पत्रकाराने व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्याने लिहिले आहे की,' माझ्या भारतीय मित्रांना आणि फॉलोअर्सने हा व्हिडिओ बघावा. हा खरा पाकिस्तान आहे. व्हिडिओ मध्ये ते एकमेकांसोबत मजा करतानाही दिसत आहेत. 'विराट कोहली आम्हाला द्या तुम्ही ट्रॉफी द्या' असे पाकिस्तानी व्यक्ती म्हणताना दिसत आहे.
I want my Indian friends & followers to watch this video. An Indian family who’re visiting Pakistan for his daughter’s tennis match in Islamabad. They met a good friend of mine Tahir Khan & asked for a lift. They’ve shared their experience in the video. This is Pakistan in real✌️ pic.twitter.com/S7VBrQawss
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) November 8, 2022
विराट कोहलीची फॅन फॉलोइंग काही कमी नाही. कोहलीची बॅट एकदा तळपली की ती थांबण्याचे नाव घेत नाही. अनेक रेकॉर्ड कोहलीच्या नावावर आहेत. पाकिस्तानातून आलेली ही ऑफर बघुनच हे स्पष्ट दिसते की विराट कोहली चे जागतिक स्तरावर किती चाहते आहेत.