गजब करे भाई! पाकिस्तानात कोंबडीला हिरवा रंग देऊन पोपट म्हणून विकलं, फोटो व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 12:38 PM2023-05-16T12:38:35+5:302023-05-16T12:42:23+5:30

एका इन्स्टा पेजने हिरव्या रंगाच्या कोंबडीचा फोटो शेअर करून हा दावा केला आहे की, एका पाकिस्तानी व्यक्तीने कोंबडीला पोपट सांगून ऑनलाइन विकलं.

Pakistani seller paints hen green and sell as parrot for 6500 rupees photo viral | गजब करे भाई! पाकिस्तानात कोंबडीला हिरवा रंग देऊन पोपट म्हणून विकलं, फोटो व्हायरल...

गजब करे भाई! पाकिस्तानात कोंबडीला हिरवा रंग देऊन पोपट म्हणून विकलं, फोटो व्हायरल...

googlenewsNext

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काहीच सांगता येत नाही. कुठेही काहीही बघायला मिळतं. कधी अजब जुगाडाचे व्हिडीओ बघायला मिळतात तर कधी लोकांचे वेगळे कारनामे ऐकायला मिळतात. जे बघून किंवा वाचून तुम्हाला हैराण व्हायला होतं. लोकांचं डोकं चक्रावून जातं. असाच एका व्यक्तीचा कारनामा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.

एका इन्स्टा पेजने हिरव्या रंगाच्या कोंबडीचा फोटो शेअर करून हा दावा केला आहे की, एका पाकिस्तानी व्यक्तीने कोंबडीला पोपट सांगून ऑनलाइन विकलं. पण अजून हे स्पष्ट होऊ शकलं नाही की, यात किती तथ्य आहे. अशात ही बातमी समोर आल्यावर सोशल मीडियावर लोक अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत. काही लोक फोटो एडीट केल्याचं म्हणत आहेत.

व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की, यात एक हिरव्या रंगाचा पक्षी दिसत आहे. जो दिसत तर कोंबडीसारखा आहे, पण फोटोनुसार त्याला पोपट सांगितलं जात आहे. याला पोपट सांगून एका व्यक्तीने ऑनलाइन साडे सहा हजार रूपयात विकलं. दावा असाही केला जात आहे की, कराचीतील एका व्यक्तीने कोंबडीला हिरवा रंग दिला आणि हा फोटो OLX वर टाकून किंमत 6 हजार 500 रूपये ठेवली. 

व्हायरल झालेला हा फोटो इन्स्टावर divamagazinepakistan नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या पोस्टला आतापर्यंत 22 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. लोक पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. 

Web Title: Pakistani seller paints hen green and sell as parrot for 6500 rupees photo viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.