प्रेमाला 'सीमा' नाही! कोलकात्यातील तरूणाशी 'लग्न' करण्यासाठी पाकिस्तानी तरूणी भारतात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 12:25 PM2023-12-06T12:25:52+5:302023-12-06T12:27:52+5:30
सध्या सोशल मीडियावर एका लॉंग डिस्टंस रिलेशनशिपची जोरदार चर्चा रंगली आहे.
Viral Video : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिनं सचिन मीणा या भारतीय तरुणाशी नेपाळमध्ये लग्न करून संसार थाटला. या अजब-गजब प्रेमाची चर्चा जगभर झाली. त्यानंतर आता आणखी एका जोडप्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. प्रियकराला भेटण्यासाठी एक तरुणी सीमा ओलांडून थेट भारतात पोहोचलीय.
आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी ही तरुणी पाकिस्तानातून चक्क भारतात आली. गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे या तरुणीने सांगितले आहे. सीमा हैदरची पुनरावृत्ती करत आणखी एक तरुणी तिच्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी भारतात आली. अटारी बॉर्डर पार ही तरूणी भारतात दाखल झाली आहे. जवेरिया खानम असे या तरुणीचे नाव आहे. कोलकात्यातील तरूणासोबत लग्न करण्यासाठी जवेरियाने भारताची वेस ओलांडली.
पाकिस्तानातून भारतात आलेली जवेरिया खानम हिला भारत सरकारकडून ४५ दिवसांचा व्हिसा मिळाला आहे. तब्बल पाच वर्ष प्रयत्न केल्यानंतर अखेर जवेरियाला व्हिसा मिळाला. मंगळवारी अटारी सीमेवरून जवेरिया खानम भारतात पोहोचली. त्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात तिचे स्वागत करण्यात आले. जेवेरियाचा प्रियकर समीर आणि त्याच्या वडिलांनी तिचे जल्लोषात स्वागत केले.
दरम्यान, "मला भारतात येऊन प्रियकर समीर खान याला भेटण्याची संधी भारत सरकराने दिली", त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे अशी प्रतिक्रिया जवेरियाने माध्यामांना दिली.
येथे पाहा व्हिडीओ :
Javaria Khanam from Karachi, Pakistan, arrived in India via the Wagah Border. She has been granted a 45-day visa to India. Her fiance, Samir Khan, and future father-in-law, Ahmed Kamal Khan Yusufzai, from Kolkata received her at Wagah Border. They are getting married in the first… pic.twitter.com/CYwbV7X3ve
— Gagandeep Singh (@Gagan4344) December 5, 2023