पाणीपुरी विक्रेत्यानं पाण्यात मूत्र मिसळलं; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 08:56 AM2021-08-22T08:56:27+5:302021-08-22T08:56:43+5:30
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाणीपुरी विक्रेत्याला अटक
सोशल मीडियावर दररोज फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजन करतात, तर काही व्हिडीओ इमोशनल असतात. काही व्हिडीओ पाहून हसू आवरत नाही, तर काही व्हिडीओ पाहून पापण्या ओल्या होतात. काही व्हिडीओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक पाणीपुरी विक्रेता पाण्यात मूत्र मिसळताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ आसामच्या गुवाहाटीमधील आहे. पाणीपुरी विक्रेता एका मगमध्ये मूत्रविसर्जन करत आहे. नंतर तेच पाणी तो पाणीपुरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यात मिसळत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मूत्रविसर्जन केल्यानंतर पाणीपुरी विक्रेता तेच भांडं खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Shocking!A street vendor(pani puri saller) has been arrestd in Guwahati after viral a sensational video in which he mixed his urine with water and using the same Water in Pani Puri.#ViralVideo#Guwahati@ABPNews@ANI@the_viralvideos@ViralPosts5@indiatvnews@TheQuint@SkyNewspic.twitter.com/ncekjhMeh1
— Mamun Khan (@Mk817Khan) August 20, 2021
टीव्ही९ भारतवर्षनं दिलेल्या वृत्तानुसार, व्हिडीओत दिसणारा विक्रेता गुवाहाटीतल्या अठगाव येथे पाणीपुरी विकतो. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी विक्रेत्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. लोकांनी सोशल मीडियावर याबद्दल तीव्र शब्दांत रोष व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. अनेकांनी तो शेअर करत संताप व्यक्त केला आहे.