Passenger open emergency get : बापरे! विमानानं उड्डाण घेताच उगाच इमरजेंसी दरवाजा उघडायला गेला; अन् मग.....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 03:03 PM2021-03-28T15:03:09+5:302021-03-28T15:05:55+5:30
Passenger open emergency get : हवेत उडत असलेल्या विमानात या माणसाच्या एका चुकीमुळे सगळ्यांचाच जीव धोक्यात आला.
शनिवारी दुपारी स्पाईसजेट विमानात (Spicejet Flight) ८९ वर्षीय व्यक्तीचा जीव धोक्यात सापडला आहे. याला कारणही तसंच होतं. विमानानं उड्डाण घेतल्यानंतर या माणसानं आपात्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकांनी विमानात एकच गोंधळ घातला. हे विमान दिल्लीहूनवाराणसीला येत होते. हवेत उडत असलेल्या विमानात या माणसाच्या एका चुकीमुळे सगळ्यांचाच जीव धोक्यात आला. दरम्यान क्रू मेंबर आणि अन्य प्रवाश्यांनी या प्रवाशाला चांगलीच शिक्षा दिली आणि वाराणसीपर्यंत बांधून ठेवलं. ‘फायझर’कडून १२ वर्षांखालील मुलांवर लसीची चाचणी सुरू; यावर्षी दुसऱ्या सहामाहीत अहवाल अपेक्षित
शनिवारी दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी स्पाईसजेट विमान ८९ प्रवाश्यांना घेऊन वाराणसाठी निघाले विमानात बसलेल्या गुरूग्रामच्या रहिवासी असलेल्या प्रवाश्यानं ने अचानक गोंधळ घालायला सुरूवात केली. आपातकालीन खिडकी उघडली त्यामुळे प्रवाशी घाबरले. जेव्हा या माणसाला आवर घालण्यासाठी क्रू मेंमर्स आणि इतर लोक धावून गेले तेव्हा या माणसानं जास्त गोंधळ घालायला सुरूवात केली. तेव्हा कसंबसं त्याला शांत बसवलं आणि बांधून ठेवलं. CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या दीर्घकाळ संसर्गानंतर 'या' आजारांचा धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा
या प्रवाश्याची मानसिक स्थिती बरी नव्हती
गौरव खन्ना म्हणजेच गोंधत घालत असलेल्या व्यक्तीला इतरांनी पकडून ठेवलं होतं. पुन्हा असं काही करू नये म्हणून तब्बल ४० मिनिटं या माणसाला पकडून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर सीआयएसएफचे अन्य सुरक्षारक्षक पोहोचले. त्यांनी या तरूणाला ताब्यात घेऊन बाहेर काढलं. पोलिसांनी या माणसाला ताब्यात घेतलं असून आता त्याची वैद्यकिय चाचणी केली जाणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या माणसाची मानसिक स्थिती बरी नसल्याने त्याने हे कृत्य केलं असावं.