हवेत असलेल्या विमानाचा दरवाजा उघडण्याचा केला त्याने प्रयत्न, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 04:03 PM2021-06-16T16:03:04+5:302021-06-16T16:04:18+5:30
हवेत उडत असलेल्या एका विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. हे करत असताना तो म्हणत होता की, त्याला विमान खाली घेऊन जायचं आहे.
प्लेन हायजॅक करणं काही खायचं काम नाही. अनेक सिनेमात तुम्ही पाहिलं असेल की, प्लेन कसं हायजॅंक करतात किंवा एखाद्या टीव्ही शोमध्ये कुणी आपला अनुभव सांगितलेला तुम्ही ऐकला असेल. अमेरिकेतून असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. इथे हवेत उडत असलेल्या एका विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. हे करत असताना तो म्हणत होता की, त्याला विमान खाली घेऊन जायचं आहे.
हे प्लेन लॉस एंजलिसहून अटलांटाला जात होतं. डेल्टा फ्लाइट १७३० मध्ये अचानक एक प्रवासी कॉकपिटजवळ गेला. तो तिथे जाऊन म्हणू लागला की, तो आता हे प्लेन खाली घेऊन जाणार. क्रू मेंबर्सने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तो काही ऐकायला तयारन नव्हता. तो पुन्हा पुन्हा हवेतील प्लेनचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता. हा सगळा प्रकार पाहून प्लेनमधील प्रवासी घाबरलेले होते.
या व्यक्तीच्या याच कारनाम्यामुळे पायलटने लगेच प्लेन ओक्लाहोमा सिटी एअरपोर्टवर लॅंडींग केलं. इथे धिंगाणा घालणाऱ्या व्यक्तीला लॉ इन्फोर्समेंट अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं.
Terrifying moment a man is restrained by passengers & crew near cockpit.
— John Scott-Railton (@jsrailton) June 12, 2021
Based on multiple reports & a check of flight tracks, this appears to be @Delta Flight 1730 (LAX - ATL) which diverted to Oklahoma City.
Developing story, details unconfirmed.pic.twitter.com/nlEa0WCkYY
John Scott-Railton ने आपल्या ट्विटरवर या घटनेचा एक व्हिडीओ शेअऱ केला होता. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती आऱडाओरड करत आहे. तो कॉकपिटजवळ उभा आहे. काही लोक त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
सीएनएनला मुलाखत देताना Curlee नावाची ही २९ वर्षीय व्यक्ती म्हणाली की, प्लेन अटलांटापासून केवळ २ तासांच्या अंतरावर असेल तेव्हा हा सगळा प्रकार घडला. त्याने सांगितलं की, सगळे लोक घाबरलेले होते. सगळे प्रार्थना करत होते की, ते सुरक्षित रहावे. सुदैवाने कुणाला काही झालं नाही.