पेंग्विनच्या रस्त्यात उभं होतं कपल, त्यानं जे केलं ते बघून लोक अवाक्; मिळाले १५ कोटी व्ह्यूज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:39 IST2024-12-24T16:36:23+5:302024-12-24T16:39:08+5:30
Penguin Viral Video : पेंग्विनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर याच कारणाने चर्चेत आला आहे. यात एक कपल पेग्विंनच्या परिसरात फिरायला आलेलं दिसत आहे.

पेंग्विनच्या रस्त्यात उभं होतं कपल, त्यानं जे केलं ते बघून लोक अवाक्; मिळाले १५ कोटी व्ह्यूज!
Penguin Viral Video : पेंग्विन एक फारच अनोखा आणि सुंदर जीव आहे. ते उडू शकत नाहीत, पण गोठवणाऱ्या थंडीत आरामात राहू शकतात. पेंग्विन सामान्यपणे दक्षिण धुव्रावर आढळतात. इथे त्यांची संख्या जास्त आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांना डोलत-डालत चालताना पाहिलं असेलच. पण कधी तुम्ही त्यांचा सभ्यपणा पाहिला नसेल. पेंग्विनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर याच कारणाने चर्चेत आला आहे. यात एक कपल पेग्विंनच्या परिसरात फिरायला आलेलं दिसत आहे. हे कपल चुकून पेंग्विनच्या रस्त्यात उभं राहतं. त्यानंतर हा पक्षी जे करतो ते बघून लोक अवाक् झाले आहेत.
अमेरिकेतील सिएरा (@ciera.ybarra) एक कंटेन्ट क्रिएटर आहे. तिने काही दिवसांआधी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो आता व्हायरल झाला आहे. यात एक पेंग्विन दिसत आहे, ज्याचा शिष्टाचार बघून सगळेच अवाक् झाले आहेत आणि त्याचं कौतुक करत आहेत सिएरा अंटार्कटिका एक्सपेडिशनवर गेली होती. इथे तिला हा पेंग्विन दिसला.
व्हिडिओत बघू शकता की, कपल बर्फाच्या चादरीवर उभं आहे आणि एकमेकांना मीठी मारत आहे. तेव्हाच मागून एक पेंग्विन येतो. तो कपलला बघून तिथेच थांबतो. तो त्याचा मार्ग बदलत नाही. ना त्यांच्यावर हल्ला करत. पेंग्विन कपल बाजूला होईपर्यंत तिथेच थांबतं. कपलही त्याला बघून हसतं आणि पेंग्विनला जाण्यासाठी रस्ता मोकळं करतं. समोरूनही एक पेंग्विन येताना दिसत आहे.
या व्हिडिओला १५ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर शेकडो लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिलं की, 'हा खूपच सुंदर क्षण आहे. महिल्यांदा पेंग्विनला असं वाट बघताना बघत आहे'. तर दुसऱ्याने लिहिलं की, 'त्याची चाल फारच क्यूट आहे'. तर एकाने लिहिलं की, 'हा क्षण इतका सुंदर आहे की, तो पुन्हा पुन्हा बघू शकतो'.