मुंबईच्या रस्त्यांवर धावतेय 'Batmobile' कार; तीन चाकी कारची इंटरनेटवर हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 01:19 PM2024-01-23T13:19:00+5:302024-01-23T13:22:06+5:30
सोशल मीडियावर 'Lynx Lean Electric' या तीन चाकी कारची जोरदार चर्चा रंगली आहे.
Social viral : सोशल मीडियावर दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ समोर येतात. कधी नेटकऱ्यांचे निखळ मनोरंजन करणारे तर कधी भन्नाट जुगाड केलेले व्हिडीओ व्हायरल होत असतात. ते कमी की काय त्यात आता मुंबईच्या रस्त्यावरुन धावणाऱ्या तीन चाकी कारची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. अमित भवानी नावाच्या एका एक्स यूजरने हा व्हिडीओ शेअर केलाय. मुंबईतील ट्रॅफिक सिग्नलला थांबलेल्या या कारकडे पाहून इतर वाहनचालकांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यामुळे अनोख्या पद्धतीने डिझाईन केलेली ही कार पाहून नेटकऱ्यांच्या भूवया उंचावल्या आहेत.
डेन्मार्कमधील 'Lynx Cars' नावाच्या एका कंपनीने या तीन चाकी कारचे डिझाईन तयार केले आहे. कूल अंदाज तसेच भन्नाट फिचर देणाऱ्या या कारच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळते आहे.
मुंबईच्या वरळी परिसरात दिवसाढवळ्या रस्त्यावरून धावणारी कार पाहून कार लव्हर्सच्या नजरा एकदम स्थिरावल्या. आकर्षक डिझाईन असलेली शिवाय कार, बाईक आणि ऑटो रिक्षाचे कॉम्बिनेशन असलेली ही बॅटमोबाईल कार चर्चेचा विषय बनते आहे.
पाहा व्हिडीओ ः
People are guessing about the Vehicle driven in Mumbai.
— Amit Bhawani 🇮🇳 (@amitbhawani) January 19, 2024
Here's everything I could find about it.
This is the Lynx Lean Electric, a two-seater, three-wheeled tilting vehicle by Lynx Cars, a Danish company.
Priced at €35,000, or ₹31,00,000, plus import costs. pic.twitter.com/otH8wSHA47
दरम्यान, सोशल मीडियावर या कारचा व्हिडीओ प्रचंड व्हायर होतोय. कारप्रेमींनी या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये 'Lynx Lean Electric' या तीन चाकी कारविषयी जाणून घेण्याची उत्सुकता वाढल्याचे पाहायला मिळते आहे.