उंच डोंगरावर असलेलं एक अनोखं कॉफी शॉप, व्हिडीओ बघून लोकांचा उडाला थरकाप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:59 IST2024-12-23T16:58:52+5:302024-12-23T16:59:44+5:30

Viral Video : व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, उभ्या डोंगराच्या भिंतीवर लोकांच्या बसण्यासाठी काही जागा बनवल्या आहेत.

People drinking coffee down a cliff in China watch video | उंच डोंगरावर असलेलं एक अनोखं कॉफी शॉप, व्हिडीओ बघून लोकांचा उडाला थरकाप!

उंच डोंगरावर असलेलं एक अनोखं कॉफी शॉप, व्हिडीओ बघून लोकांचा उडाला थरकाप!

Viral Video : वेगवेगळ्या ठिकाणांवर जाऊन चहा किंवा कॉफी पिण्याची आवड अनेकांना असते. काही लोकांची चहा-कॉफी पिण्याची ठिकाणं ठरलेली असतात. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात चीनमधील एक कॉफी शॉप पाहून लोक अवाक् झाले आहेत. पण हे काही मार्केटमधील साधंसुधं कॉफी शॉप नाही.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, उभ्या डोंगराच्या भिंतीवर लोकांच्या बसण्यासाठी काही जागा बनवल्या आहेत. हे एक कॉफी शॉप आहे. इथे बसून लोक कॉफीसोबतच समुद्राच्या जबरदस्त व्ह्यू चा आनंद घेऊ शकतात. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कॉफी शॉपचं नाव क्लिफ कॉफी आहे.

व्हिडिओतील कॉफी शॉपचं लोकेशन पाहून लोक हैराण झाले आहेत. यात बघू शकता की, काही लोक या कठड्यांवर बसून कॉफी पित आहेत. हा डोंगर चीनच्या फूजियानमधील गुशी गावातील आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम हॅंडलवर चायना इनसायडर पेजवर शेअर करण्यात आला आहे. हे अनोखं आणि अंगावर काटे आणणारं कॉफी शॉप पाहून लोकांची बोलती बंद झाली आहे. 

लोक या अनोख्या आयडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काही लोकांना ही आयडिया आवडली तर काहींनी हे धोकादायक असल्याचं म्हटलं. एकाने कमेंट केली की, या शॉपचं नाव रिस्की कॉफी का ठेवत नाहीत. 

Web Title: People drinking coffee down a cliff in China watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.