उठाले रे बाबा उठाले! काळ्या रंगाची इडली पाहून भडकले इडली फॅन्स, लोक म्हणाले - अरे आवरा रे ह्यांना...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 03:15 PM2021-12-16T15:15:45+5:302021-12-16T15:18:52+5:30

Black Idli : इडली हा साऊथ इंडियन डिशेजपैकी एक शानदार डिश आहे. लोक इडली लंच, डीनर आणि नाश्त्यातही आवडीने खातात. इडली हे हेल्दी फूड मानलं जातं.

People get angry after watch black idli video | उठाले रे बाबा उठाले! काळ्या रंगाची इडली पाहून भडकले इडली फॅन्स, लोक म्हणाले - अरे आवरा रे ह्यांना...

उठाले रे बाबा उठाले! काळ्या रंगाची इडली पाहून भडकले इडली फॅन्स, लोक म्हणाले - अरे आवरा रे ह्यांना...

googlenewsNext

सोशल मीडियावर (Social Media) अलिकडे विचित्र फूड कॉम्बिनेशनचा नवा ट्रेंड बघायला मिळतो. यातील काही फ्यूजन फूड्स खरंच चांगले असतात, पण काही फार विचित्र असतात. हे विचित्र कॉम्बिनेशनचे फूड बघून फूड लव्हर्सचा मात्र पारा चढतो. चॉकलेट मॅगी आणि रसगुल्ला चाटनंतर आणखी एक अजब डिश समोर आली आहे. जी बघून लोकांनी तोंड वाकडं केलंय. आपण सामन्यपणे इडली (Idli) पांढऱ्या रंगाचीच बघतो आणि बऱ्याच वर्षापासून आपण ती खात आलो आहोत.

काळ्या रंगाची इडली?

इडली हा साऊथ इंडियन डिशेजपैकी एक शानदार डिश आहे. लोक इडली लंच, डीनर आणि नाश्त्यातही आवडीने खातात. इडली हे हेल्दी फूड मानलं जातं. पण इडलीच्या फॅन्सनी इडली वेगळ्या प्रकारे तयार होताना पाहिली आणि त्यांचा पाराच चढला. या अनोख्या इडलीचं नाव ब्लॅक डिटॉक्स इडली (Black Detox Idli) आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल (Black Idli Viral Video) झालेल्या या व्हिडीओत एक स्ट्रीट फूड विक्रेता एका प्लेटमध्ये काळ्या रंगाचं पाणी इडलीवर टाकताना दिसत आहे. त्यावर काही मसाले टाकतो आणि ती इडली तो खोबऱ्याच्या चटणीसोबत देतो.

हा व्हिडीओ फूड ब्लॉगर्स विवेक आणि आयशा यांन इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शॉकिंग इमोजीसोबत या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे की, 'तुम्ही कधी काळी इडली खाल्ली आहे का?. हा व्हिडीओ पाहिल्यावर लोक अजब प्रतिक्रिया देत आहेत.  एका यूजरने लिहिलं की, 'नाही...नाही...थांबा'. लोक अशाच एकापेक्षा एक मजेदार कमेंट्स करत आहेत.
 

Web Title: People get angry after watch black idli video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.