Optical Illusion: मिठी मारत असलेल्या कपलचा फोटो पाहून चक्रावून गेले लोक, जाणून घ्या कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 12:31 PM2022-04-06T12:31:18+5:302022-04-06T12:34:48+5:30

Optical Illusion: असाच डोकं चक्रावून सोडणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो समुद्र किनाऱ्यावरचा असून यात एक कपल मिठी मारताना दिसत आहे.

People get shocked after watching this optical illusion photo | Optical Illusion: मिठी मारत असलेल्या कपलचा फोटो पाहून चक्रावून गेले लोक, जाणून घ्या कारण....

Optical Illusion: मिठी मारत असलेल्या कपलचा फोटो पाहून चक्रावून गेले लोक, जाणून घ्या कारण....

Next

Optical Illusion: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे हैराण करणारे फोटो व्हायरल होत असतात. ज्यातील काही फोटोंमध्ये काही रहस्य तर काही अवाक् करणारं लपलेलं असतं. मेंदूवर जोर देऊनही जर ही गुपितं उलगडण्याचा प्रयत्न केला तर ते जमत नाही. 

असाच डोकं चक्रावून सोडणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो समुद्र किनाऱ्यावरचा असून यात एक कपल मिठी मारताना दिसत आहे. या कपलमध्ये पुरूषाने पांढऱ्या रंगाचे आणि महिलेने काळ्या रंगाचे कपडे घातले आहेत.

दोघांचेही पाय उलटे

दोघे यात मिठी मारत आहेत त्याबाबत काही वाद नाहीये. पण समस्या आहे त्यांचे पाय. फोटोत तुम्ही बघाल तर दोघांचेही पाय उलटे दिसत आहे. काही फोटो पाहून म्हणत आहेत की, यात काही ट्रिक आहे. काही लोक तर याला भूतांचा फोटो म्हणत होते. तर काही याला फोटो ट्रिक म्हणाले. फोटो जर बारकाईने पाहिला तर लक्षात येईल की, हा फोटो ना भूतांचा आहे ना यात काही ट्रिक वापरलेली आहे.

काय आहे भानगड

मग प्रश्न असा पडू शकतो की, दोघांचेही पाय उलटे का दिसत आहे? एका व्यक्तीने याचं रहस्य उलगडलं आहे. 'द सन' च्या रिपोर्टनुसार, या व्यक्तीने बारकाईने फोटोचं विश्लेषण केलं. यानंतर सांगितलं की, महिला-पुरूषाने फोटो काढताना कोणत्याही ट्रिकचा वापर केलेला नाही. पण त्यांच्या कपड्यांमध्ये याचं रहस्य दडलं आहे.

पुरूषाने पांढऱ्या रंगाच्या टि-शर्ट सोबत काळी कॅप्री घातली आहे आणि त्या कॅप्रीमध्ये पांढऱ्या रंगाचा कापड गुंडाळून महिलेसोबत असा काही उभा राहिला की, हा फोटो अजब बनला. यामुळे समजत नाहीये की, कुणाचे पाय कोणते आहेत. पण यात काही ट्रिक नाही. हा केवळ कपड्यांमुळे झालेला घोळ आहे.

आणखी एक लॉजिक

एका  दुसऱ्या व्यक्तीने खुलासा केला की, 'पुरूषाने जो शार्ट्स घातला आहे त्याचे दोन रंग आहे. मधे पांढला आणि दोन बाजूला काळा. महिलेने काळ्या रंगाचे कपडे घातले आहे. ज्यामुळे हा भ्रम होत आहे. शॉर्ट्सचा काळा भाग पांढऱ्या भागाच्या वर येतो, पण हे केवळ त्यांचे कपडे आहेत जे भ्रम निर्माण करत आहेत'.
 

Web Title: People get shocked after watching this optical illusion photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.