भारतातील या कारागृहात एक रात्र राहण्यासाठी द्यावे लागतात पैसे, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 05:19 PM2022-09-29T17:19:51+5:302022-09-29T17:31:50+5:30
आपल्याकडे तुरुंग म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. कोणालाही तुरुंगात जायचे नसते. तुरुंगात असणारे गुन्हेगार बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण आपल्या देशात असं एक तुरुंग आहे, या तुरुंगात जाण्यासाठी अनेकजण पैसे मोजतात.
नवी दिल्ली : आपल्याकडे तुरुंग म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. कोणालाही तुरुंगात जायचे नसते. तुरुंगात असणारे गुन्हेगार बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण आपल्या देशात असं एक तुरुंग आहे, या तुरुंगात जाण्यासाठी अनेकजण पैसे मोजतात. तर एक राहण्यासाठी वेटींगवर असतात. हे तुरुंग उत्तराखंड येथील आहे.
तुरुंग प्रशासनाने येणाऱ्यांसाठी खास ऑफरही ठेवली आहे. हे तुरुंग उत्तराखंड येथील हल्दानी येथे आहे. ५०० रुपये भरुन या कारागृहात तुम्ही एक रात्र राहू शकता. लोक कारागृहात जातात याच कारणही तितकच इंटरेस्टींग आहे. लोकांना वाईट कामांपासून दूर ठेवण्यासाठी कारागृहातील एका रात्रिचा अनुभव यावा यासाठी ही ऑफर असल्याचे सांगितले जाते.
एका अहवालानुसार, लोकांच्या कुंडलीत गृह नक्षत्रांची स्थिती पाहून एकवेळा कारागृहात जाण्याची ज्योतिष भविष्यवाणी करतात. त्यामुळे अनेकजण भविष्यातील संकट टाळण्यासाठी एका रात्रीचे पैसे देवून कारागृहात जातात. यासाठी कारागृह प्रशासनाने एक विभाग तयार केला आहे. रात्रिसाठी ५०० रुपये आकारुन कारागृह प्रशासन व्यवस्था करते.
उत्तराखंड येथील हल्दानी येथे हे कारागृह १९०३ मध्ये बनवले आहे. कारागृह कर्मचाऱ्यांची राहण्याच्या सोयीसह एका शस्त्रागाराची व्यवस्था करण्यात आली आहे. यातच कारागृह प्रशासनाने एक रात्र राहण्यासाठी येणाऱ्या लोकांची व्यवस्था केली आहे. या जेलमध्ये एक डमी कारागृह बनवले आहे. यात ज्योतिषांनी सांगितल्यानंतर एक रात्र राहण्यासाठी लोक येत असतात. यासाठी ५०० रुपये आकारले जातात.