BRT बस खराब झाली अन् पाकिस्तानचे लोक धक्का मारायला गेले; भारतीयांनी उडवली खिल्ली, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 08:06 PM2020-11-23T20:06:10+5:302020-11-23T20:09:29+5:30
Viral Video in Marathi : बसला धक्का मारण्याच्या कारणावरून पाकिस्तानी पब्लिकला ट्रेल केलं जात आहे.
पाकिस्थानातील पेशावरमध्ये एक बस तांत्रिक कारणामुळे बंद पडली. तुमचा विश्वास बसणार नाही पण त्यानंतर पाकिस्तानची पब्लिक धक्का मारायला पोहोचली आहे. हा घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेहमीप्रमाणे भारतीय सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाले आहे. बसला धक्का मारण्याच्या कारणावरून पाकिस्तानी पब्लिकला ट्रेल केलं जात आहे.
BRT Peshawar getting local help pic.twitter.com/H7w8XfVV5J
— Murtaza Ali Shah (@MurtazaViews) November 20, 2020
दर्जेदार बस उत्तम आणि उच्च राहणीमानाचे प्रतिक आहे. भष्ट्राचाराचे विवाद आणि अन्य दुर्घटनामध्ये पाकिस्तानच्या पेशावरमध्ये ही बस सुरू आहे. पाकिस्तानच्या रस्त्यावर ही बस खराब झाल्यानंतर लोक या बसला धक्का देण्यासाठी गर्दी करू लागले. ही घटना शुक्रवारी अब्दारा स्थानकाजवळ घडली. या घटनेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. वाह, नशीब चमकलं! रुग्णालयात कुत्र्याला नोकरीवर ठेवलं; अन् आता करतोय 'हे' काम
Lahore’s Orange Line metro providing new entertainment opportunities to public 🤦🏼♂️😐 🚇 pic.twitter.com/pEf4q3uT0j
— Danyal Gilani (@DanyalGilani) November 2, 2020
या आधीही पाकिस्थाना मेट्रोचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. २७ किलोमीटरच्या या ऑरेंज लाईनमध्ये जवळपास २६ स्टेशन येतात. आता पाकिस्तानातील लोक सहज लांबचा प्रवास करू शकतात. बसने ज्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तासनतास घालवावे लागतात. त्या ठिकाणी मेट्रोने अत्यंत कमी वेळात पोहोचता येऊ शकतं. सोशल मीडियावर यादरम्यान अनेक व्हिडीओज व्हायरल झाले होते. त्यात लोक प्रवासाचा आनंद घेताना दिसून आले. दनयाल गिलानी यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाग होता. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते. की, पाकिस्तानची जनता प्रवासाचा आनंद घेत आहे. बाबो! 'या' राजकुमारीचे बॉडीगार्डशी प्रेमसंबंध; अन् तोंड बंद ठेवायला दिले तब्बल १२ कोटी