Viral Video: कर्माचे फळ! म्हशीला काठीने मारत होते, मुक्या प्राण्याने शिकवला असा आयुष्यभरासाठीचा धडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 05:27 PM2022-03-31T17:27:14+5:302022-03-31T17:34:13+5:30

सध्या असाच आणखी एक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला यातील माणसांचा राग येईल. मात्र, व्हिडिओचा शेवट पाहून समाधानही वाटेल (Buffalo took Revenge).

people were beating buffalo buffalo teaches lesson Karma gives it back video goes viral on internet | Viral Video: कर्माचे फळ! म्हशीला काठीने मारत होते, मुक्या प्राण्याने शिकवला असा आयुष्यभरासाठीचा धडा

Viral Video: कर्माचे फळ! म्हशीला काठीने मारत होते, मुक्या प्राण्याने शिकवला असा आयुष्यभरासाठीचा धडा

googlenewsNext

प्राण्यांना बोलता येत नाही किंवा आपलं दुःख व्यक्त करता येत नाही. मात्र, अशी अनेक प्रकरणं आहेत ज्यात हे प्राणी माणसांपेक्षा जास्त माणुसकी दाखवतात. अनेकदा प्राणी माणसांसाठी काहीही करायला तयार असतात, मात्र कधीकधी माणूस आपल्या स्वार्थासाठी प्राण्यांना प्रचंड त्रास देतो. माणसांनी प्राण्यांवर अत्याचार करतानाचे अनेक व्हिडिओ (Animal Cruelty Video) समोर आले आहेत. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला यातील माणसांचा राग येईल. मात्र, व्हिडिओचा शेवट पाहून समाधानही वाटेल (Buffalo took Revenge).

प्राचीन काळापासून लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल वाहून नेण्यासाठी प्राण्यांचा वापर करत आहेत. जनावरे गाडीला बांधून वाहतुकीसाठी वापरली जातात. मात्र, यादरम्यान अनेकजण जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या प्राण्यांना काठीने मारतात. अशाच एका अत्याचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये पाच जण म्हशीला गाडीला बांधून पळवताना दिसतात. यादरम्यान ते म्हशीला सतत काठीने मारहाण करत आहेत.

सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ सोशल मीडिया साइट ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये गाडीमध्ये बसलेले पाचजण म्हशीच्या मदतीने आपली गाडी पळवताना दिसतात. यादरम्यान ते म्हशीचा वेग वाढवण्यासाठी सतत तिला काठीने मारहाण करत असतात. म्हैस बिचारी सतत आपला वेग वाढवत राहाते. मात्र गाडीमध्ये बसलेले पाच लोक म्हशीला तरीही काठीने मारत राहातात.

हे पाचजण म्हशीवर अत्याचार करत असताना अचानक या प्राण्यानेही त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. यानंतर म्हैस वेगात दुभाजकाकडे धावली आणि वेगात ही गाडी दुभाजकाला धडकल्याने ती उलटली. यानंतर पाचही जण धाडकन खाली रस्त्यावर आपटले. आयएफएस अधिकाऱ्याने व्हिडिओला 'कर्मा' असं कॅप्शन दिलं आहे. म्हणजेच कर्माचं फळ मिळतंच. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत असून हा अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला गेला आहे.

Web Title: people were beating buffalo buffalo teaches lesson Karma gives it back video goes viral on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.