रॅम्पवर कॅटवॉक करताना Model चा मृत्यू, बघत राहिले सगळेजण!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 12:38 PM2019-04-29T12:38:05+5:302019-04-29T12:41:38+5:30
मृत्यू एक अशी घटना आहे जी सांगून येत नाही. मृत्यू कुठेही कसाही येऊ शकतो. याआधी कधी कलाकार स्टेवर परफॉर्म करताना मृत्यू मरण पावल्याच्या, रस्त्याने चालता चालता मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहे.
मृत्यू एक अशी घटना आहे जी सांगून येत नाही. मृत्यू कुठेही कसाही येऊ शकतो. याआधी कधी कलाकार स्टेवर परफॉर्म करताना मृत्यू मरण पावल्याच्या, रस्त्याने चालता चालता मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहे. अशीच एक दुर्देवी घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. शनिवारी २७ एप्रिल रोजी एका मॉडलचा रॅम्प वॉक करताना मृत्यू झाला.
२६ वर्षीय टेल्स सोएर्स हा Sao Paulo Fashion Week मध्ये भाग घेण्यासाठी आला होता. इथे कॅटवॉक करताना त्याची तब्येत अचानक बिघडली आणि तो रॅम्पवरच कोसळला. त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टर्सने त्याला मृत घोषित केले.
El modelo Tales Soares se desvaneció durante la pasarela de #OCKSA en la #SPFW, falleció mientras era atendido en el hospital al que fue trasladado, en #SaoPaulo, #Brasilpic.twitter.com/9fsx31d0Jv
— David de la Paz (@daviddelapaz) April 28, 2019
वरील हे फोटो हे तुम्हाला विचलित करु शकतात. टेल्स सोएर्स कॅटवॉक करताना अचानक खाली कोसळला. बराच वेळ तो तसाच पडून होता. सर्वांना वाटलं की, हा सादरीकरणाचा भाग असेल. पण नंतर तो उठला नाही तेव्हा लोक त्याच्याजवळ आले. रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. टेल्स हा एमजीटी नावाच्या मॉडलिंग एजन्सीमध्ये काम करत होता. एजन्सी त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. आणि ही घटना दुर्देवी असल्याचं म्हटलं.