अरे बापरे! जंगलात असल्यासारखा सिंह फिरतोय रस्त्यावर, व्हिडिओ बघुन नेटकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 05:26 PM2021-08-17T17:26:48+5:302021-08-17T17:31:17+5:30
सध्या एक सिंह रस्त्यावर फिरतोय. तोही अगदी ऐटीत आणि आरामात. त्याला बघुन भल्याभल्यांच्या तोंडच पाणी पळालंय.
जंगलाचा राजा सिंह जर तुम्हाला फक्त जंगलातच पाहायला मिळतो असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. सध्या एक सिंह रस्त्यावर फिरतोय. तोही अगदी ऐटीत आणि आरामात. त्याला बघुन भल्याभल्यांच्या तोंडच पाणी पळालंय.
Friend shot this video this morning. Is the lion loose in BKK1? #phnompenh#cambodiapic.twitter.com/mZWBjdR0XR
— Mike Gebremedhin (@Mgebremedhin) August 16, 2021
Mike Gebremedhin या युजरनं हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला आहे. यात एक सिंह मानवी वस्तीत बंगल्याच्या बाहेर अगदी आरामात फिरताना दिसतोय. तो असा काही ऐटीत चाललाय जसं की हे जंगलच आहे.
Friend shot this video this morning. Is the lion loose in BKK1? #phnompenh#cambodiapic.twitter.com/mZWBjdR0XR
— Mike Gebremedhin (@Mgebremedhin) August 16, 2021
A lion being kept as a pet in a house in Phnom Penh by wealthy Chinese businessman Qi Xiao has been wandering in the street outside, apparently unsupervised. How long will this madness and cruelty be allowed to continue? 1/4 pic.twitter.com/8MXiFPObMN
— Andrew MacGregor Marshall (@zenjournalist) August 16, 2021
Andrew MacGregor Marshall यांनी या सिंहाचे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिलीय त्यात असं लिहिलंय की हा सिंह कंबोडियाची राजधानी नोम पेन्ह येथील बंगल्याच्या बाहेर आढळला होता. हा सिंह मोठे बिझनेसमॅन Qi Xiao यांचा आहे. टिकटॉकवर याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंबोडियातील अधिकाऱ्यांनी त्याला सुरक्षित स्थळी नेले होते.
Qi Xiao यांनी विनंती केल्यानंतर कंबोडियाचे प्रधानमंत्री हुन सेन यांनी त्याला परत करण्याचे आदेश दिले होते. या सिंहाच्या अशा रस्त्यावर फिरण्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये दहशत पसरली आहे. हे आमच्या जीवावर बेतू शकते असे काही रहिवाशांचे म्हणने आहे. तसा रोष त्यांनी व्यक्त केला आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.