बोंबला! नवरा झोपला होता; अन् बायकोनं ऑनलाईन कपडे विकण्यासाठी त्यालाच बनवलं मॉडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 11:28 AM2021-01-31T11:28:32+5:302021-01-31T11:34:07+5:30
Trending Viral news in Marathi : ही आयडिया फिलिपींसमधील एका ऑनलाईन बुटीक चालवत असलेल्या महिलेनं लावली आहे.
सोशल मीडियावर एका झोपलेल्या माणसाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण या माणसानं महिलांचे कपडे घातले आहेत. एकावर एक ड्रेस या माणसाच्या अंगावर घालण्यात आले आहेत. जेणेकरून पाहणाऱ्या व्यक्तीला हे ड्रेस कसे दिसतात याबाबत माहिती मिळू शकेल. एखाद्या दुकानाच्या बाहेर पुतळे उभे असतात. त्याचप्रमाणे या माणसाच्या अंगावर कपड लावलेले दिसून येत आहेत. ही आयडिया फिलिपींसमधील एका ऑनलाईन बुटीक चालवत असलेल्या महिलेनं लावली आहे. नवरा झोपला असताना या महिलेनं असा प्रकार केल्यामुळे नेटकरी अवाक् झाले आहेत.
हा फोटो ऑनलाईन शॉपी नावाच्या फेसबूकपेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, पुतळा नाहीये? काहीच प्रोब्लेम नाही. आतापर्यंत या फोटोवर १० हजारांपेक्षा जास्त लोकांच्या रिएक्शन्स आल्या असून २२ हजारापेक्षा जास्त लोकांनी शेअर केला आहे. २२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी शेअर केलं असून ६ हजारांपेक्षा जास्त कमेंट्स या फोटोवर आल्या आहेत. जास्तीत जास्त लोकांनी या क्रिएटिव्ह कल्पनेचे कौतुक केलं आहे. झोपलेल्या माणसाचा चांगला उपयोग करून घेतल्याचे म्हटले आहे. काय सांगता? कचोरी, जिलेबी खायला येतं 'हे' माकड; सकाळीच दुकानात नाष्ता करायला येऊन बसतं
काय आहे संपूर्ण प्रकरण
Jo’s Online Shoppe ची मालकीण Jocelyn May Jazreno Caday ने जेव्हा आपल्या पतीला झोपलेल्या अवस्थेत पाहिलं. तेव्हा ठरवलं की, याचा वापर क्लोथिंग मॉडेलप्रमाणे करून घ्यायला हवा. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालून तिनं पतीचे फोटो काढले. जेव्हा या महिलेनं फेसबुकवर फोटो शेअर केला तेव्हा लोकांनी भन्नाट रिएक्शन द्यायला सुरूवात केली आहे. भयंकर! ५ वर्षांच्या मुलीला बाथरूमध्ये घेऊन गेली जन्मदाती आई; आधी डोळे काढले मग कापली जीभ