लोकल ट्रेनमधून घोड्याचा प्रवास; फोटो व्हायरल होताच रेल्वेने दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 01:23 PM2022-04-08T13:23:25+5:302022-04-08T13:24:51+5:30

photo of horse travelling in local train : मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा फोटो पश्चिम बंगालमधील  (West Bengal) सियालदह-डायमंड हार्बर डाउन लोकल ट्रेनचा आहे.

photo of horse travelling in local train goes viral railway ordered probe | लोकल ट्रेनमधून घोड्याचा प्रवास; फोटो व्हायरल होताच रेल्वेने दिले चौकशीचे आदेश

लोकल ट्रेनमधून घोड्याचा प्रवास; फोटो व्हायरल होताच रेल्वेने दिले चौकशीचे आदेश

googlenewsNext

कोलकाता : लोकल ट्रेनमध्ये (Local Train) प्रवास करण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागतो. असातच एका व्यक्तीने आपला घोडा सोबत घेऊन ट्रेनमधून (Horse in the Train) प्रवास केला. आता या व्यक्तीचा आणि त्याच्या घोड्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोनुसार, ट्रेनमध्ये मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या कष्टाने लोकांना उभे राहण्यासाठी जागा मिळाली आहे. या गर्दीत एक घोडाही दिसत आहे आणि त्याचा मालक त्याच्या जवळच असल्याचे दिसून येत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा फोटो पश्चिम बंगालमधील  (West Bengal) सियालदह-डायमंड हार्बर डाउन लोकल ट्रेनचा आहे. बंगालमधील बरुईपूर येथे हा घोडा शर्यतीत (Race) सहभागी होऊन परतत असल्याचे बोलले जात आहे. घोड्यासह ट्रेनमध्ये चढलेल्या व्यक्तीला प्रवाशांनी (Passengers) आक्षेप घेतला, मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही, असे सांगण्यात येत आहे. 

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दक्षिण 24 परगणामधील बरुईपूर भागात घोड्यांची शर्यत होती. या घोड्याचा मालक त्या स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यानंतर तो आपल्या घोड्याने दक्षिण दुर्गापूर स्थानकात आला. दुसरीकडे, पूर्व रेल्वेच्या प्रवक्त्यांनीही असा फोटो मिळाल्याची कबुली दिली आहे, मात्र प्रत्यक्षात असे काही घडले आहे की नाही याची माहिती नाही. सध्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे सांगितले. 

लोक म्हणाले, 'घोडा दिसला नाही का?'
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवर लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. ती व्यक्ती घोड्यासह ट्रेनमध्ये कशी चढली हे समजत नाही. रेल्वे स्थानकावर उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांना एवढा मोठा घोडा दिसला नाही का? असे सवाल करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, रेल्वेने प्राण्यांची वाहतूक करण्यासाठी वेगळे नियम केले आहेत. प्रवासी डब्यात अशा प्रकारे प्राणी घेऊन जाणे म्हणजे थेट नियमांचे उल्लंघन आहे.

Web Title: photo of horse travelling in local train goes viral railway ordered probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.