विजयानंतर ज्यो बायडन यांच्या नातीने सोशल मीडियावर शेअर केला फोटो; नेटिझन्स म्हणाले.....
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 07:42 PM2020-11-09T19:42:58+5:302020-11-09T19:57:21+5:30
Viral News in Marathi : बायडन यांच्या विजयाचे भारतातही अनेक ठिकाणी सेलिब्रेशन होतान दिसत आहे.
डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडेन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. ट्रम्प यांच्या पराभवाने अमेरिकेत तब्बल 128 वर्षे जुना विक्रमही मोडला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सलग दुसऱ्यांदा लोकांनी पॉप्युलर वोटमध्ये पराभूत केले आहे.
11.07.20 pic.twitter.com/HHVJMmIoAW
— Naomi Biden (@NaomiBiden) November 7, 2020
बायडन यांच्या विजयाचे भारतातही अनेक ठिकाणी सेलिब्रेशन होतान दिसत आहे. तर, भारतातही अशाच बदलाची गरज असल्याचे मतही अनेकजण व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर सध्या ज्यो बायडन आणि त्यांच्या कुटूंबाचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून नेटिझन्सनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अशक्य! फक्त १५ सेकंदात या चौघी मिळून झाल्या वाघ; विश्वास बसत नाही?, मग पाहा व्हिडीओ
ज्यो बायडन यांची नात नियोमी बायडन हिने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या माध्यमातून बायडन यांना शुभेच्छा देण्यात आल्याा आहेत. या व्हायरल फोटोला आतापर्यंत ४४ हजारापेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केलं असून तीन लाखांपेक्षा जास्त सोशल मीडिया युजर्सनी या फोटोला लाईक केले आहे. ट्विटर युजर्स म्हणाले की लवकरात लवकर व्हाईट हाऊसमधून बायडन यांचा कुटूंबासह असलेला फोटो समोर येईल.
चमत्कार! 'हे' २ शब्द ऐकून शुद्धीवर आला तब्बल ६२ दिवसांपासून कोमात गेलेला १८ वर्षीय तरूण
अमेरिकेत सुरू असलेल्या मतमोजणीकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. अखेर बायडेन यांनी विद्यमान अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प यांना पराभूत केले. बायडेन यांना २७३, तर ट्रम्प यांना २१४ मते पडली. बायडेन यांना ५०.५ टक्के म्हणजे ७४४७८३४५ मते, तर ट्रम्प यांना ४७.७ टक्के म्हणजे ७०३२९९७० मते मिळाली आहेत. पेनसिल्वेनियात अखेर बायडेन यांनी ट्रम्प यांना पराभूत केले आहे.