खारूताईचे 'हे' चार फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरला लागला चक्क १ वर्षाचा वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 12:03 PM2019-10-15T12:03:08+5:302019-10-15T12:03:59+5:30
निसर्गाला फोटोमध्ये कैद करणं एक कठीण काम आहे. पण मेहनत आणि सहनशीलता असेल तर त्याचं फळ मिळतंच.
निसर्गाला फोटोमध्ये कैद करणं एक कठीण काम आहे. पण मेहनत आणि सहनशीलता असेल तर त्याचं फळ मिळतंच. Terry Donnelly नावाचे एक ५० वर्षीय फोटोग्राफर आहेत. ते यूकेचे राहणारे आहेत. त्यांनी एका खारूताईचे चार फोटो काढलेत. यातील आश्चर्याची बाब म्हणजे हे चार फोटो कॅप्चर करण्यासाठी त्यांना चक्क एक वर्ष इतका वेळ लागला.
हे फोटो टेरीने त्यांच्या घराच्या मागच्या बागेत काढले आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांचं हे वर्ष Man Vs Squirrel असं गेलं आहे. त्यांनी या वर्षाच्या सुरूवातीलाच स्वत:ला हे आव्हान दिलं होतं. हे चार फोटो कॅमेरात कैद करण्यासाठी त्यांना एक वर्षांचा कालावधी लागला.
या चारही फोटोंची खासियत ही आहे की, या चारही फोटोंमध्ये खारूताई ही हवेत आहेत. म्हणजे ती एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जाते तेव्हाचे क्षण. हेच नेमके क्षण कॅमेरात कैद करण्यात आले आहेत. टेरी रोज सकाळी उठून खारूताईच्या हालचालीचे फोटो काढत होते. पण खारूताईच्या वेगापुढे ते नेहमी फेल व्हायचे. मात्र, एक दिवस त्यांना यश मिळालं.
घराच्या मागेच करण्यात आला होता सेटअप
टेरीने फोटोग्राफीसाठी हे असं घर तयार केलं होतं. त्यांनी हे घर केल्यामुळे खारूताई रोज येऊ लागल्या. ते रोज फोटो काढू लागले. मोठ्या मेहनतीनंतर त्यांनी काही खास फोटो कॅप्चर केलेत. हे खारूताईचे फोटो पाहिल्यावर असं वाटतं जणू खारूताई मार्शल आर्टची एखादी स्टेप करत असावेत.