जबरदस्त! बिबट्या एक शेपट्या दोन; दुसरा बिबट्या शोधून शोधून दमलेत लोक, बघा तुम्हीही ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 04:21 PM2021-06-28T16:21:34+5:302021-06-28T16:34:13+5:30
Social Viral : हा फोटो पाहून लोक संभ्रमात पडले आहेत. कारण एका झाडावर एक बिबट्या बसलेला दिसतोय. पण फोटोतील मजेदार बाब म्हणजे दोन शेपट्या दिसत आहेत.
सोशल मीडिया यूजर्सना नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो बघून त्यातील रहस्य उलगडण्यात नेहमीच मजा येते. सोशल मीडियावर प्राण्यांचे असे ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. असाच एक बिबट्याचा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा फोटो पाहून लोक संभ्रमात पडले आहेत. कारण एका झाडावर एक बिबट्या बसलेला दिसतोय. पण फोटोतील मजेदार बाब म्हणजे दोन शेपट्या दिसत आहेत.
Can you spot a young leopard cubs face.@NikonIndia@ParveenKaswanpic.twitter.com/NPp3nBRFWs
— Mohan Thomas (@GetMohanThomas) June 25, 2021
हा फोटो कर्नाटकाच्या जंगलातील असून अनेकांना या फोटोने चक्रावून सोडलं आहे. वाइल्ड लाइफ फोटोग्राफर मोहन थॉमस यांनी काढला असून या फोटो एक बिबट्या आपल्या पिल्लासोबत झाडावर आराम करत आहे. मात्र, बिबट्या स्पष्टपणे दिसतोय आणि त्याचं पिल्लू लपलेलं आहे. हेच पिल्लू शोधत शोधत लोक डोकं खाजवत आहेत. (हे पण बघा : हरणाच्या पाडसासोबतचा बिबट्याचा फोटो व्हायरल, बघून विचार कराल - नेमकं सुरू काय आहे!)
IFS अधिकारी प्रवीण कासवान यांना टॅग करत मोहन यांनी विचारलंय की, 'बिबट्याच्या पिल्लाचा चेहरा तुम्हाला दिसला का?'. त्यांनीही मोहन यांचं ट्विट रिट्विट करून त्यात किती बिबटे आहेत हे यूजर्सना विचारलं आहे.
तुम्हाला वाटत असेल की, तुमची नजर चांगली आहे किंवा तुमच्या नजरेतून काही सुटत नाही तर थोडा वेळ बारकाईने शोध घ्या आणि बिबट्याचं पिल्लू शोधा. दुसरा बिबट्या कुठे आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच. पण त्याआधी तुम्ही जरा मेंदूचा व्यायाम होऊ द्या.
दुसरा बिबट्याची शेपटी जरी स्पष्ट दिसत असली तर त्याचं तोंड शोधणं खरंच अवघड आहे. दुसरा बिबट्या अगदी दोन्ही खोडांच्या मधोमध आहे. जरा बारकाईने पाहिलं तर तुम्हाला नक्की दिसेल. खोडाचा आणि बिबट्याचा रंग जरा सारखाच असल्याने तो पटकन दिसत नाही.
सोशल मीडियावर लोक या फोटोवर भरभरून कमेंट करत आहेत. त्यावरून हे दिसून येतं की, दुसरा बिबट्या फारच कमी लोकांना दिसला. तर अनेकांना बिबट्या न दिसल्याने ते कासावीस झाले आहेत.