समुद्रात सापडला दुर्मीळ शार्क मासा, त्याचं तोंड पाहून लोक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 03:27 PM2021-09-10T15:27:56+5:302021-09-10T15:30:19+5:30
इटलीतील समुद्रात नेव्ही ऑफिसर्स मासे पकडण्यासाठी गेले होते. जेव्हा त्यांनी पाण्यात जाळं फेकलं तर एक दुर्मीळ मास त्यात अडकला.
जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. ज्यांना बघून लोक हैराण होतात. पण एका शार्क माशाच्या फोटोने सगळेच हैराण झाले आहेत. ही घटना आहे इटलीतील. इथे एल्बा आयलॅंडच्या पाण्यात एका व्यक्तीला डुकरासारखं तोंड असलेला शार्क मासा सापडला. या माशाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रिपोर्टनुसार, इटलीतील समुद्रात नेव्ही ऑफिसर्स मासे पकडण्यासाठी गेले होते. जेव्हा त्यांनी पाण्यात जाळं फेकलं तर एक दुर्मीळ मासा त्यात अडकला.
जाळ्यात अडकलेल्या शार्कचं नाव एंग्युलर रफशार्क आहे. ज्याला Pig Faced Shark असंही म्हणतात. मिळालेल्या माहितीनुसार, रफशार्क समुद्रात साधारण २,३०० फूट खोल पाण्यात आढळतात. बरेच लोक या शार्कला पहिल्यांदाच बघत आहेत. अनेकांना याचा चेहरा पाहून धक्काही बसला आहे.
this rare pig-faced shark was recently spotted and i mean LOOK AT IT pic.twitter.com/6OLt4tmoAW
— Rob N Roll (@thegallowboob) September 10, 2021
या माशाचं सायंटिफिक नाव ऑक्सीनॉटस एंट्रीना आहे. शार्कची ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. ज्याला IUCN ने इंडेजंर्डच्या कॅटेगरीत सामिल केलं आहे