अजून किती भरणार! बसमध्ये ५५ ची क्षमता, भरले तब्बल १८० प्रवासी; मोजताना अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 03:15 PM2023-03-05T15:15:59+5:302023-03-05T15:16:44+5:30

सणांच्या काळात शहरातून आपल्या गावी जाण्यासाठी अनेकजण प्रवासात खासगी बसचा वापर करतात. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना प्रवास करत असल्याची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली असतील असेच एक आता उत्तर प्रदेशमधून समोर आले आहे.

pilibhit a 55 seater private bus carrying 180 passengers was seized by rto | अजून किती भरणार! बसमध्ये ५५ ची क्षमता, भरले तब्बल १८० प्रवासी; मोजताना अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे

अजून किती भरणार! बसमध्ये ५५ ची क्षमता, भरले तब्बल १८० प्रवासी; मोजताना अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे

googlenewsNext

सणांच्या काळात शहरातून आपल्या गावी जाण्यासाठी अनेकजण प्रवासात खासगी बसचा वापर करतात. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना प्रवास करत असल्याची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली असतील असेच एक आता उत्तर प्रदेशमधून समोर आले आहे. होळीच्या दिवशी लवकर घरी पोहोचण्यासाठी काही जण जीव धोक्यात घालून ओव्हरलोड बसमधून प्रवास करत आहेत. पैसे कमावण्यासाठी बसचालकही सुरक्षेची पर्वा न करता एकाच बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेत आहेत.

BREAKING: पाकचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या घरी पोहोचले पोलीस, अटकेची शक्यता

आरटीओ अधिकाऱ्यांना एका बसला पकडून कारवाई केली आहे. या बसमध्ये तब्बल १८० प्रवासी प्रवास करत असल्याचे समोर आले आहे.  या बसची क्षमता ५५ आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, एआरटीओ वीरेंद्र कुमार सिंह त्यांच्या टीमसोबत होळीच्या निमित्ताने NH730 वर तपासणी करत होते. यावेळी त्यांची नजर यूपी ३१ टी ७७८७ क्रमांकाच्या बसवर पडली. बस जालंधरहून बहराइचच्या दिशेने जात होती. 

प्रवाशांना पाहण्यासाठी आरटीओ अधिकारी स्वत: बसमध्ये चढले. यावेळी प्रवाशांची संख्या पाहून आश्चर्य वाटले. सामान ठेवल्यासारखे प्रवासी एकमेकांवर बसल्याचे समोर दिसत होते. एआरटीओने तेथील प्रवाशांची मोजणी सुरू केली असता ते चक्रावून गेले. या बसमध्ये १०० किंवा ११० नाही तर १८० जण प्रवास करत होते.

एआरटीओने तातडीने बस रिकामी करून ती ताब्यात घेतली. 'होळीच्या सुट्टीमुळे ते पंजाबमधील जालंधरहून बहराइचला जात असल्याचे प्रवाशांनी सांगितले. या प्रवाशांकडून ८०० ते १००० रुपये भाडे म्हणून घेतले जात होते. एआरटीओने तत्काळ तीन बसेसची व्यवस्था करून सर्व लोकांना बसवून इच्छित स्थळी रवाना केले. एआरटीओने बस ताब्यात घेऊन कारवाई केली.
 

Web Title: pilibhit a 55 seater private bus carrying 180 passengers was seized by rto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.