चोरीला गेलेला एक पिटबुल, त्याचे सहा दावेदार, त्यात सातव्याची एन्ट्री; पोलिसांनी बिरबलाची ट्रिक वापरली...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 11:06 AM2022-09-29T11:06:32+5:302022-09-29T11:16:35+5:30
आपल्या देशात श्वान पाळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पिटबुल जातीचा श्वान अनेकजण पाळतात. पिटबुल जातीच्या श्वानने आतापर्यंत हल्ला केल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील. मेरठमधील एक वेगळीच घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली : आपल्या देशात कुत्रा पाळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पिटबुल जातीचा श्वान अनेकजण पाळतात. पिटबुल जातीच्या कुत्र्याने आतापर्यंत हल्ला केल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतील. मेरठमधील एक वेगळीच घटना समोर आली आहे. पिटबुल जातीच्या श्वानाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. पुढ हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे.
हे प्रकरण मेरठमधील आहे. चोरांनी एका घरातून पिटबुल जातीच्या कुत्र्याची रिक्षातून चोरी केली. रिक्षा काही अंतरावर गेल्यानंतर त्या कुत्र्याने चोरांवर हल्ला केला. या हल्ल्यात ते चोर जखमी झाले. जखमी चोरांनी या कुत्र्याला एका महाविद्यालयाच्या गेटवर सोडून निघून गेले.
Optical Illusion: फोटोत आधी काय दिसलं यावरून होईल तुमच्या व्यक्तित्वाबाबत खुलासा
महाविद्यालय परिसरात बेवारस पिटबुल श्वानाची माहिती मिळताच अनेकांनी त्यावर दावा केला. या श्वानाची माहिती वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली. अनेकजण येवून तो कुत्रा आपलाच असल्याचे सांगू लागले. कोण त्याला प्रेमाणे बोलवू लागले तर कोण त्याला खायला देवू लागले. शेवटी हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले.
पोलिसांनी दावा करणाऱ्या प्रत्येकाकडे चौकशी केली. पण या कुत्र्याने एकाही व्यक्तीला ओळख दाखवली नाही, त्यामुळे पोलिसांनी या श्वानाला कोणाच्याही ताब्यात दिले नाही. ही बातमी सोशल मीडियावर पसरली. यानंतर हा पिटबुल जातीचा कुत्रा ज्यांचा होता त्यांच्यापर्यंत ही माहिती मिळाली. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठताच तो कुत्रा च्यांच्याजवळ जावून थांबला.त्यामुळे पोलिसांचीही खात्री पटली.
'मराठी रॅप सुनने गुज्जू भी ...'; अमरावतीच्या मराठी पोट्टीचा सोशल मीडियात बोलबाला
या श्वानाचे मालक सुभाष चौधरी यांनी परिसरात शोधशोध सुरू केली हाती. तो मिळाल्यानंतर ते खुश झाले. हल्ला करणाऱ्या पिटबुल कुत्र्याची चोरी झाल्यामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत होते, पण या कुत्र्याने स्वत:ची आपली सुटका करुन घेतली.