Video - धक्कादायक! प्रेग्नेंट महिलेने पतीसह ठेवली ग्रँड पार्टी; पाहुण्यांसमोर क्रॅश झालं प्लेन अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 10:10 AM2023-09-04T10:10:13+5:302023-09-04T10:10:51+5:30
एका कपलने पार्टीचं आयोजन केलं होतं, जिथे मोठ्या संख्येने लोक आले होते.
सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका कपलने जेंडर रिव्हल पार्टीचं आयोजन केलं होतं, जिथे मोठ्या संख्येने लोक आले होते. आनंद साजरा केला जात असताना मोठी दुर्घटना घडली. मेक्सिकोमध्ये ही घटना घडली आहे. पाहुण्यांसमोर विमान क्रॅश झालं आहे. हे एक स्टंट प्लेन होतं, जे पार्टीत रंगत आणण्यासाठी बोलावलं होतं पण हे नंतर जीवघेणं ठरलं.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, अद्याप या कपलची ओळख पटलेली नाही. दोघेही 'ओह बेबी' या चिन्हासमोर एकमेकांचे हात हातात घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. एक विमान वरून रंग पसरवताना दिसतं. यानंतर लोकांच्या ओरडण्याचा आवाज येतो. प्रत्यक्षात विमान नियंत्रणाबाहेर गेलं. स्थानिक न्यूज आऊटलेटनुसार, अधिकाऱ्यांना नंतर पायलट ढिगाऱ्याखाली सापडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे पायलटला मृत घोषित करण्यात आले.
Pilot killed after his Piper PA-25 left wing failed at a gender reveal party in the town of San Pedro, Mexico. pic.twitter.com/6JILK7fsGm
— Breaking Aviation News & Videos (@aviationbrk) September 3, 2023
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकाराबाबत चर्चेला उधाण आलं आहे. एका युजरने म्हटलं आहे की, 'पायलटची अजिबात पर्वा न करता कॅमेरा ज्या प्रकारे कपलकडे पुन्हा वळवला गेला ते दुःखद आहे.' दुसऱ्या युजरने 'क्षणभर मला वाटलं की सर्वांनी विमान पाहिलं म्हणून ते किंचाळत आहे. पण तसं नाही, हे फक्त कॅमेरामनच्याच लक्षात आलं असं म्हटलं आहे.
याआधीही जेंडर रिव्हल पार्ट्यांमुळे मोठे अपघात झाले आहेत. 2020 मध्ये कॅलिफोर्नियाच्या जंगलात यामुळे आग लागली होती. जे 10,000 एकर जमिनीवर पसरले आहे. तर दुसऱ्या एका पार्टीत फटाके आणि इतर गोष्टींमुळे झाडांना आग लागली. 2019 मध्ये, ऑस्ट्रेलियातील एका कपले आपल्या बाळाचं जेंडर सांगण्यासाठी त्यांची कार जाळली. अशा इतर अनेक घटना पाहिल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.