सुपरफास्ट ट्रेनने विमानाला उडविले; पायलट थोडक्यात बचावला, Live Video पाहून उडेल थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 03:48 PM2022-01-11T15:48:32+5:302022-01-11T15:48:48+5:30
रेस्क्यू टीमनं समोर ट्रेन येताना पाहिली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ.
Plane Crash On Train Track: अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे विमान आणि ट्रेन यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. हे कोणत्याही चित्रपटातील दृश्य नसून ही घटना खरी घडली आहे. एक विमान रेल्वेच्या ट्रॅकवर अपघातग्रस्त होऊन पडलं होतं. इतकंच नाही, तर वैमानिकही त्या विमानात अडकला होता. त्यात वेळ समोरुन अतिशय वेगानं एक ट्रेन आली.
जेव्हा वैमानिकाला वाचवण्यासाठी आलेल्या रेस्क्यू टीमनं समोर ट्रेन येताना पाहिली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी अडकलेल्या वैमानिकाला वाचवण्याचे अतोनात प्रयत्न केले. या घटनेचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नक्कीच तुमचा थरकाप उडेल.
Foothill Division Officers displayed heroism and quick action by saving the life of a pilot who made an emergency landing on the railroad tracks at San Fernando Rd. and Osborne St., just before an oncoming train collided with the aircraft. pic.twitter.com/DDxtGGIIMo
— LAPD HQ (@LAPDHQ) January 10, 2022
रिपोर्ट्सनुसार एक छोट्या विमानानं कॅलिफोर्नियाच्या पॅकोइमा येथून उड्डाण घेतलं होतं. परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे ते रनवेवरून उडताच जवळ असलेल्या एका रेल्वे ट्रॅकवर अपघातग्रस्त झालं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायर होत आहे. यामध्ये अपघातग्रस्त विमान हे रेल्वे ट्रॅकवर कोसळलेलं दिसत आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये काही पोलीस कर्मचारी अडकलेल्या वैमानिकाला वाचवण्याचे खुप प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच समोरून येणारी ट्रेन विमानाच्या जवळ येण्यापूर्वीच ते वैमानिकाचा जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. या घटनेचा व्हिडीओ पोलिसांच्या खांद्यावर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामधून रकॉर्ड झाला आहे.