भारताला लागून असलेल्या 'या' भागातून का उडत नाही विमान? कारण वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:54 IST2025-01-09T16:26:41+5:302025-01-09T16:54:45+5:30
Tibet Pathar: जगभरातील विमानं या भागापासून दूर का राहतात? कुठे आहे हे ठिकाण? याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

भारताला लागून असलेल्या 'या' भागातून का उडत नाही विमान? कारण वाचून व्हाल अवाक्...
Tibet Pathar : जगभरात अनेक ठिकाणी नो फ्लाईंग झोन आहेत. म्हणजे या ठिकाणांवरून विमान उडवण्यास परवानगी नसते. पण भारताला लागून एक असाही भाग आहे, जिथे नो फ्लाईंग झोन तर नाही, पण तरीही त्या भागातून विमान उडवलं जात नाही. अशात असा प्रश्न समोर येतो की, जगभरातील विमानं या भागापासून दूर का राहतात? कुठे आहे हे ठिकाण? याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
आता तुम्ही एक अंदाज लावला असेल की, हा भाग १० ते १५ किलोमीटरचा असेल. मात्र, व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, हा भाग १० ते १५ किलोमीटर नाही तर यात फ्रान्सच्या आकाराचे पाच देश सामावू शकतात. जर तुम्ही फ्लाइट रडारचे फोटो बघाला तर समजेल की, या भागातून एकही विमान उडत नाही. विमानांची दिशाच सांगते की, हा भाग सोडून विमान उडतात. या भागाला तिबेट पठार म्हटलं जातं.
कोई भी विमान तिब्बत के ऊपर से उड़ान क्यों नहीं भरता है।
— Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) January 8, 2025
वो आप वीडियो को देखकर समझें। pic.twitter.com/rT1RdqHda2
काय आहेत कारणं?
या भागातून विमान उडत नाहीत, याची तीन कारणं सांगण्यात आली आहेत. पहिलं म्हणजे तिबेटमध्ये खूप उंच शिखर आहेत. येथील डोंगरांची सरासरी उंची साधारण 14,800 फूट आहे. तर माउंट एव्हरेस्टची उंची २९ हजार फूट आहे. कमर्शिअल विमानं साधारण ३३ हजार फूट उंचीवर उडत असतात. पण एखाद्या इमरजन्सीच्या स्थितीत हे उडण्याची उंची कमी करून 10 फुटावरून उडतात. उंची जास्त असल्यानं असं करणं तिबेटमध्ये शक्य नाही. जर इथून उड्डाण घेतलं तर विमान क्रॅशही होऊ शकतं.
दुसरं कारण असं सांगितलं जातं ते म्हणजे येथील वातावरण. तिबेटच्या पठारामध्ये अचानक वातावरण बदलतं आणि वेगानं वारे वाहू लागतात. ज्यामुळे विमानात वादळात अडकू शकतं. त्यामुळे या भागातून विमान उडवणं महागात पडू शकतं.
या भागातून विमान न उडवण्याचं तिसरं कारण म्हणजे या भागात पुरेसे विमानतळ नसणं आहे. ज्यामुळे इमरजन्सी लॅंडींग शक्य नाही. एका रिपोर्टनुसार, तिबेटमध्ये केवळ ५ एअरपोर्ट आहे. त्यामुळे विमान या भागात जात नाही.